Loksabha Election 2024 : आता घड्याळाची गरज पडत नाही, मोबाईलमध्ये वेळ समजते : सुप्रिया सुळेंचा टोला

Supriya Sule खासदार सुप्रिया सुळे आज बारामती मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आल्या होत्या. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शर्थ करावी लागत आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी घड्याळ चिन्हाबाबत वक्तव्य करत तुतारीच चिन्ह आपल्यासाठी कसं शुभ आहे. हे एका प्रचार भेटीदरम्यान सांगितले आहे.

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आल्या होत्या. या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या पोटातील बाहेर आलं आहे. चंद्रकांत पाटील मागे बारामतीतून बोलले की, आम्हाला फक्त शरद पवारांना संपवायचं आहे, यांना काम करायचं नाही विकास नकोय ही ईस्ट इंडिया कंपनी पवारांना संपवायला निघाली आहे.

सगळे एक झाले आहेत, हे दुर्दैव महाराष्ट्रचा एक मराठी माणूस दिल्लीत लढतोय आणि हे लोक त्याला संपवत आहेत. त्यासाठी पक्ष, घर फोडत आहेत. देशात भाजपला एकहाती सत्ता देऊन लोकांच्या पदरात काहीच पडलं नाही. देश दडपशाहीकडे चालला आहे. एक पोस्ट केली धमक्या दिल्या जातात, त्यामुळे लोक घाबरत आहेत. मात्र, याच्या विरोधात लढले पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule News : सूनबाईविरोधात प्रचार करायला खडसेंचा नकार; सुप्रिया सुळे म्हणतात...

आमचा पक्ष काढून घेतला, त्यांना वाटलं आम्ही रडू, पण आम्ही रडणार नाही लढणार आहोत. आता मी घड्याळ वापरत नाही. माझ्यासमोर बसलेल्या अनेक लोकांनी घड्याळ घातले नाही. कारण आता मोबाईलमध्ये वेळ समजते. त्यामुळे घड्याळाची गरज पडत नाही, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पांडुरंगाने माझ्याकडून घड्याळ काढून घेतलं, पण तुतारी चिन्ह शुभ माझ्यासाठी दिलं. लग्नात तुतारी वाजते, विठ्ठलाची पूजा करताना तुतारी वाजते, छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध सुरू केले, त्यावेळेसदेखील तुतारी वाजवली जात असे, असेही सुळे म्हणाल्या.

Edited By : Umesh Bambare

R

Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule News: भाजप पदाधिकाऱ्यांचा निरुत्साह, सुप्रिया सुळेंच्या पथ्यावर पडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com