Pune News, 5 May : बारामती मतदारसंघासाठी ( Baramati Lok Sabha Constituency ) मंगळवारी ( 7 मे ) मतदान होणार आहे. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) विरुद्ध सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्यात ही लढत झाल्यानं देशात चर्चिली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पण, 2014 मध्ये महादेव जानकर बारामतीतून कमळ चिन्हावर लढले असते, तर आमचा सुपडा साफ झाला असता, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर ( Mahadev Jankar ), अशी लढत झाली होती. त्यात महादेव जानकर यांचा 70 हजार मतांनी पराभव झाला होता. अशातच डोर्लेवाडी येथे सुनेत्रा पवार प्रचारार्थ झालेल्या सभेत अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार म्हणाले, "2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती कमळ चिन्हावर निवडणूक लढवली असती, तर आपला सुपडासाफ झाला असता. गेल्यावेळी आपण थोडक्यात बचावलो."
"खडकवासलातील लोकांनी मला सांगितलं, दादा महादेव जानकर यांनी 2014 च्या निवडणुकीत कमळ चिन्ह घेतलं असतं तर, सुपडा साफ झाला असता. कारण, खडकवासल्यामधील मतदारांना कपबशी हे जानकर यांचं चिन्ह आहे, हे माहिती नव्हतं," असं अजित पवार यांनी सांगितलं.
"यावेळी मतदारसांच्या समजणुकीत बदल झाला आहे. जनतेनं जानकर यांचं शिट्टी चिन्ह लक्षात ठेवलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी परभणीत आल्यावर जानकर यांचा हात धरून वर करत हा 'आपला छोटा भाऊ आहे' असं म्हटलं. त्यामुळे जनतेला शिट्टीला मत म्हणजे कमळाला मत असं लक्षात आले," असं अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.