Ajit Pawar News : '...तर मी पवारांची औलाद नाही!'; अजितदादांनी 'वाई'करांना शब्द दिला

Loksabha Election 2024 : 24 तास काम करुन सात तारखेला महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मताधिक्य द्या. कारण ते...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : देशाच्या, राज्याच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी मोदींच्या विचारांचा खासदार आपल्यातून दिल्लीला गेला पाहिजे. वाई, महाबळेश्वर, खंडाळ्यातून उदयनराजेंना मताधिक्य द्या. येत्या जूनमध्ये नितीनकाकांना राज्यसभेवर घेऊन खासदार करणार आहे. नाही केल तर मी पवारांची औलाद नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाईच्या जनतेला दिला.

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारार्थ वाई येथील भाजी मंडईच्या मैदानावर झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धर्यशील कदम, भाजपचे सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ajit Pawar
Dindori constituency 2024 : भारती पवार म्हणतात,"विरोधक आता दुःखी झाले असतील"

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. मी पहिल्यांदा ज्यावेळी कॅबिनेट मंत्री झालो, त्यावेळी साताऱ्याचा पालकमंत्री झालो. 1999 ते 2004 या कालावधीत अनेक अनुभव या जिल्ह्यात आले. यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी पुढे आली आहे. चव्हाणसाहेबांनंतर किसन वीर, मदनराव पिसाळ, लक्ष्मणराव पाटील, बाळासाहेब भिलारे या सर्वांच्या आठवणी आज येत असून मी त्यांना अभिवादन करतो.

...म्हणून उदयनराजेंना मताधिक्य द्या!

मकरंद आबा व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले आहेत. 24 तास काम करुन सात तारखेला महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मताधिक्य द्या. कारण ते सातारच्या गादीचे वारस आहेत. युगपुरुष शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. त्यांचा आदर्श ठेऊन आपण वाटचाल करत आहोत. इथून पुढे काम करताना बाकीचा विचार करु नका. विकासकामांचे आमच्यावर सोडा. आज मी तुमच्याकडे विकासासाठी मते मागायला आलो आहे. मोदीसाहेब, देशाचे 'विकास पुरुष' म्हणून ओळखले जात आहेत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

शाहू, फुले आंबेडकर विचार धारेचा आमचा पक्ष असून दोन पावले मागे पुढे जावे लागते. त्यावेळी शरद पवारसाहेबांनी (Sharad Pawar) सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत जावे लागले. त्यांच्याविषयी एकही तक्रार येऊन देऊ नका, असे सांगितले. ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या आम्ही केल्या. पण, पंतप्रधान मोदींवर एक शिंतोडा उडाल्याचे पहायला मिळत नाही. पाकिस्तानला दणका दिला. युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी पुतीनला फोन लावला. युद्ध थांबवून स्पेशल विमान पाठवून आपले विद्यार्थी तेथून सुरक्षित आणले. हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, त्यासाठी दमदार नेताच लागतो.

विकासासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी मोदींच्या विचारांचा खासदार आपल्यातून दिल्लीला गेला पाहिजे. घड्याळ चालविण्याचा विचार केला, सर्व निवडणुकीत स्थापनेपासून घड्याळाला विजयी केले. आता भाषणात नितीनकाकांचे नाव उदयनराजेंनी घेतलं, मकरंद आबांनी घेतलं आहे. आता तुमच्या मनात ही तेच असेल. महायुतीचा उमेदवाराला वाई, महाळेश्वर, खंडाळातून लाखांचे मताधिक्य द्या. समोर कोणी नाही. तेही कमळाचे काम करत आहेत. आपल्यालाही तेच काम करायचे.

Ajit Pawar
Kalyan Lok Sabha : डोंबिवलीत ठाकरेंना पुन्हा झटका, उपजिल्हाप्रमुखासह माजी नगरसेविका शिंदे गटात दाखल

येत्या जूनमध्ये नितीनकाकांना राज्यसभेचा खासदार करणार आहे. नाही केलं तर मी पवारांची औलाद नाही, असा विश्वास त्यांनी दिला. राजेंना तिकीट गेलेले असले तरी बाकीची सगळी जबाबदारी माझ्यावर घेतलेली आहे. सगळ्या सहकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे. तुमची सगळ्यांची कामे उदयनराजे करतील. त्यांना वेळ मिळाला नाही तर आपला हक्काचा नितीनकाका राज्यसभेचा खासदार म्हणून काम करेल. पण, त्याने सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करावे. आता त्यांनी पायाला भिंगरी लावून मकरंद आबाप्रमाणे पक्षाला ताकद देण्याचे काम करावे व उदयनराजेंना मताधिक्य द्यावे असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com