Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : मी तरी 35 वर्षे साथ दिली, शरद पवारांनी अकरा वर्षांतच सोडली! अजितदादांनी जुनं काढलं...

Sudesh Mitkar

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar News) शिरूरमध्ये पूर्णपणे अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अजित पवारांच्या सभांचा धडाका सुरू असून या सभांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांची दुसरी फेरी सुरू झाली आहे. आज घोडेगाव येथे झालेल्या सभेत अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी पक्ष विलीनीकरणाबाबत एका मुलाखतीत सुचक संकेत दिल्यानंतर अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणुकीमध्ये (Election) भावनिक होऊन चालणार नाही, असे सांगत अजित पवार म्हणाले, राजकारणामध्ये प्रत्येकाला कोणीतरी संधी देत असतं. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारसाहेबांना (Sharad Pawar) संधी दिली, म्हणून साहेब कर्तृत्व आणि नेतृत्व दाखवू शकले. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) साहेबांनी शरद पवारांना 1967 ला संधी दिली. मात्र, इतिहास असा सांगतो की, 1978 ला शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना सोडलं. (Latest Political News)

चव्हाण साहेब म्हणत होते की, असं करू नका तरी देखील अकरा वर्षांतच शरद पवार यांनी त्यांना सोडलं. यशवंतराव चव्हाण यांचा फोन देखील उचलला नाही. हे सर्व ‘लोक माझी सांगाती’ या पुस्तकात आहे. मी तरी शरद पवार यांची तीस-पस्तीस वर्षे साथ दिली. असं अजित पवार म्हणाले. (Lok sabha election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्ता असेल तर लोकांची कामं करता येतात. पद गेल्यावर कोणी विचारत नाही, असं म्हणत अजित पवारांनी आर आर पाटलांचे उदाहरण दिलं. 26 /11 च्या हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यायला सांगितला. मी त्यांना म्हणालो की, इतक्यात राजीनामा देण्याची घाई करायला नको होती. मात्र, त्यांनी वरिष्ठांचं ऐकलं आणि राजीनामा दिला.

26/11 नंतर राजीनामा देऊन आबा गावाला पुढचे पाच-सहा दिवस गेले. त्यानंतर मात्र त्यांना कोणी भेटायला देखील गेलं नाही. सहा महिन्यांनी मी त्यांना हेलिकॉप्टर पाठवून मुंबईला बोलून घेतलं आणि त्यांना अध्यक्ष केलं. ते पुन्हा कामाला लागले. सत्ता नसेल तर तुम्हाला काही करता येत नसल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

बारामतीत मी आईसोबत मतदानाला गेलो. आता मी ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, तिला सोबत घेऊनच मतदानाला जाणार ना? बरं पहिल्यांदाच गेलो असं आहे का? प्रत्येक मतदानाला आई माझ्यासोबत मतदानाला येते. ह्यांच्या पोटात आत्ताच का दुखलं, अशी टीका अजित पवारांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT