Shirur Lok Sabha Election 2024 : 'याच्या गळ्यात गमचा टाकला, खासदार केला तरी...' ; अजितदादांनी कोल्हेंना जोरदार सुनावले!

Lok Sabha Election 2024 : "अमोलला पक्षात घेतलं, खासदार म्हणून निवडून आणला तरी याला खासदारकी सोडून पळून जायचं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे.
Shirur Lok Sabha Election 2024
Shirur Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका संपल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरकडे लक्ष केंद्रित केले आहे. आज शिरूरमध्ये एकाच दिवशी चार सभांचा धडका अजित पवार लावणार आहेत. त्यापैकी पहिल्याच सभेत अजित पवारांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना जोरदार सुनावले. "अमोलला पक्षात घेतलं, खासदार म्हणून निवडून आणला तरी याला खासदारकी सोडून पळून जायचं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरूरमध्ये एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना मदतीसाठी 188 कोटींचा निधी आला. काहींना पैसे मिळाले. काहींचे बाकी आहे. ज्यांचे बाकी आहे, त्यांना आम्हीच पैसे देणार आहोत. दुसरं कोणी देणार नाही. जे इथे गप्पा हाणायला येतात ना, मीच त्यांना (अमोल कोल्हे) पक्षाचं तिकीट दिलं होतं. मीच त्यांना शोधून आणलं होतं. माझ्या घरी आले, तेव्हा त्यांना जेवायला घातलं. त्यावेळी सतत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे फोन येत होते. मी त्याला म्हणालो, अजिबात फोन घ्यायचा नाही. त्याचा फोन घेतला आणि खिशात टाकून दिला आणि माझ्या बंगल्यावरून तेव्हाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Mumnde) बंगल्याकडे आम्ही गेलो. तेव्हा प्रेसला बोलावलं त्याच्या गळ्यात पक्षाचा गमचा टाकला. पक्षप्रवेश झाला."

Shirur Lok Sabha Election 2024
Nana Bhangire News : नाना नॉट रिचेबल; अन् नीलमताई म्हणतात 'ऑल इज वेल' !
Shirur Lok Sabha Election 2024
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गट आक्रमक; अजित पवार गटाविरोधात गंभीर तक्रारी, कुठं काय घडलं?

अजित पवार म्हणाले, "अमोलचा पक्षप्रवेश करून घेतला तेव्हा तो म्हणाला, दादा मी उभा तर राहतो, पण सगळं तुम्ही बघायचं. मी काही बघणार नाही. मी फक्त भाषणं करणार. मी त्याला आश्वस्त केले की, जे काही नियमात बसतं तेवढा खर्च आपण करू. काळजी करू नको. जिवाचं रान करू. त्याला खासदार म्हणून निवडून आणला. खासदार झाल्यावर दोन वर्षांनी तो म्हणतो, दादा मी सेलिब्रिटी आहे. मी अभिनेता आहे. मला हे राजकारण जमत नाही आणि राजीनामा घेऊन आला. मी त्यांना म्हणालो, काही करून पाच वर्षे कडेला काढा बाबा, नाहीतर लोक आपल्याला मारतील. अशी त्याने पाच वर्षे काढले, अशी आठवण अजितदादांनी (Ajit Pawar) सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com