महाराष्ट्रातील महायुती आणि आघाडीच्या लढतीत आता आणखी एका राष्ट्रीय पक्षाने उडी घेतली आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत असणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी ( Vanchit Bahujan Aghadi ) देखील अनेक जागांवरती आपली छाप सोडण्यास सज्ज झाली आहे. अशातच मायावतींचा राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पक्ष ( bahujan Samaj Party ) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील जागांवर उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ( Lok Sabha Election 2024 ) सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत पुणे जिल्ह्यात होत आहेत. बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगणार असल्यानं सर्वांचं लक्ष या लढतीवर लागलं आहे. त्यासह शिरूर मतदारसंघातील कोल्हे विरोधात आढळराव ही लढतदेखील राज्यात चर्चिली जात आहे. यातच पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती या मतदारसंघांत उमेदवार देण्याची तयारी बहुजन समाज पक्षाने ( bahujan Samaj Party ) केली आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलखतींचं आयोजन केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुरुवारी, 4 एप्रिल रोजी सायं. 4.00 वाजता, पुणे इंटरनॅशनल स्कूल टिंगरेनगर येथे या मुलाखती पार पाडणार आहेत. बहुजन समाज पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुख्य झोन प्रभारी, महासचिव महाराष्ट्र प्रदेश डॉ. हुलगेश चलवादी आणि झोन प्रभारी सचिव महाराष्ट्र प्रदेश सुदीप जी. गायकवाड या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आले आहे. याबाबतची जाहिरात बहुजन समाज पार्टी पुणे झोन अंतर्गत देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आणि महायुतीत मुख्य लढत होणार आहे. या लढतीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचं विभाजन होऊ त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचं वारंवार महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत. यातच बसपा रिंगणात उतरल्यास याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला बसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच, बारामती लोकसभा मतदारसंघात ताई ( Supriya Sule ) विरोधात वहिनींच्या ( Sunetra Pawar ) लढतीत मायावतींच्या बसपाची एन्ट्री झाल्याचं बोललं जात आहे.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.