Supriya Sule News : सुळे यांनी संस्कार दाखवून पाठिंबा देऊन टाकावा, मानकर यांनी का केली ही मागणी !

Supriya Sule Vs Sunetra Pawar : आईच्या विरोधात न लढता त्यांना मुलगी म्हणून आशीर्वाद घेऊन टाकावा
Supriya Sule, Deepak Mankar
Supriya Sule, Deepak MankarSarkarnama

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माझ्या आई समान असलेल्या वहिनीला भाजपने माझ्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवले असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावरून आता महायुतीतील विविध पक्षातील नेते टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आज पुणे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule, Deepak Mankar
Lok Sabha Election 2024: 'यवतमाळ-वाशिम'मध्ये 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'; चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धंगेकर यांच्या शिक्षणाबाबतची पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट महायुतीतील नेत्यांकडून व्हयरल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. या मुद्द्यावरती आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मानकर म्हणाले, या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा हे चौथी पास होते. राजकीय जीवनामध्ये समाजाचं काम किती करतोय समाजाचे हित किती जपतोय आणि प्रशासनावरती आपलं नियंत्रण किती राहू शकत हे महत्त्वाचे असते. त्याच अभ्यास असणारा व्यक्तीदेखील चागल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे राजकीय जीवनात शैक्षणिक मुद्दा गौण आहे.

मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर होते. कोविड काळामध्ये त्यांनी अत्यंत उत्तमरीत्या काम केलं आहे. घरातील व्यक्ती अॅडमिट असतानादेखील मोहोळ फिल्डवर उतरून काम करत होते, त्याची पावती सामान्य नागरिक नक्कीच मोहोळ यांना देतील आणि चांगल्या मताधिक्याने मोहोळ खासदार होतील, असा विश्वास मानकर यांनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यावरून बोलताना मानकर म्हणाले, सुप्रिया सुळे यांना जर सुनेत्रा पवार या आई वाटत असतील तर त्यांनी आईच्या विरोधात न लढता त्यांना मुलगी म्हणून आशीर्वाद घेऊन टाकावा. वहिनीला जर त्या आई मानत असतील तर आईचे मुलीवरती संस्कार असतात, त्या संस्कारांची जपणूक करण्याची संधी सुप्रिया सुळे यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांनी आईला पाठिंबा देऊन टाकावा, असं मानकर म्हणाले.

( Edited By : Chaitanya Machale)

R

Supriya Sule, Deepak Mankar
Amol Kolhe News : खासदार साहेब पाच वर्षे कुठे होता? शिरूरमध्ये लागले बँनर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com