Ajit Pawar Vs Supriya Sule : कुंपणावर नाही, निर्णय घ्या दादा की ताई; डबल ढोलकीवाल्यांची झाली पंचायत

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभेतील दोन्ही उमेदवार हे पवार कुटुंबीयातील आहेत. त्यामुळे पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत.
ajit pawar supriya sule
ajit pawar supriya suleSarkarnama

बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आता लढत निश्चित झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता सुप्रियाताई की अजितदादा, याबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तटस्थ राहणारे आणि दादा आणि ताईंकडे ये जा करणारे चांगलेच कात्रीत सापडले आहेत.

खडकवासला मतदारसंघांमध्ये भाजपची आणि राष्ट्रवादीची सम-समान ताकद आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला हा मतदारसंघ अवघ्या काही मताधिक्याने गमवावा लागला. हडपसर विधानसभा मतदारसंघ मागच्या वेळेस भाजपकडे होता, तर 2019 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे ( Chetan tupe ) त्या ठिकाणी निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे ताकद मोठी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या मतदारसंघातील काही नेते अजितदादांकडे ( Ajit Pawar ) गेले, तर काही शरद पवारांबरोबर ( Sharad Pawar ) राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बहुतांश पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिका लढवण्यासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते अद्यापही सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आल्या की त्यांच्याबरोबर आणि अजित पवार ( Ajit Pawar ) आले की त्यांच्याबरोबर असल्याचे चित्र आत्तापर्यंत पाहायला मिळत आलं आहे. आता बारामती आणि शिरूर मतदारसंघांमध्ये लोकसभेचा प्रचार जोमाने सुरू झालेला आहे. त्यामुळे तटस्थ न राहता कोणती तरी एक बाजू पकडून प्रचाराच्या कामाला लागणं क्रमप्राप्त झालं आहे.

ajit pawar supriya sule
Supriya Sule Vs Sunetra Pawar : "भावाची बायको ही आईसमान असते तिचा सन्मान करा अन्...", शिंदे गटाचा सुळेंना टोला

आगामी महापालिका निवडणुकीत तिकीट मिळवण्याची हमी हवी, असेल तर ताईंबरोबर राहणं अनेकांना सोयीचं वाटत आहे, तर दुसरीकडे दादा सत्तेत आणि पालकमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये काम केल्यास त्याची पोचपावती म्हणून चांगलं पद मिळू शकतं आणि आपली कामंही होऊ शकतात, अशी आशादेखील अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे.

त्यामुळे फोन आल्यावर दादा, ताईंबरोबर असल्याचं सांगितलं जातं. परंतु, ही 'डबल ढोलकी' लवकरच बंद होणार आहे. कारण बारामती लोकसभेतील दोन्ही उमेदवार हे पवार कुटुंबीयातील आहेत. तेच उमेदवार एकाच कुटुंबातील नसते, आपले पटत नाही किंवा अन्य काही कारणे देऊन वेळ मारून नेता आली असती. मात्र, आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे दोन उमेदवार असल्याने तटस्थ पदाधिकारी कात्रीत सापडले आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

ajit pawar supriya sule
Supriya Sule News : सुळेंचा थेट दादांच्या आमदाराला 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा इशारा; नेमकं काय म्हणाल्या?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com