MP Amol Kolhe Sarkarnama
पुणे

MP Amol Kolhe Property News : खासदार अमोल कोल्हे आहेत कर्जदार; संपत्तीत झाली दुपटीने वाढ !

Amol Kolhe has 5 lakh 16 Thousand Gold : कोल्हे यांच्याकडे पाच लाख 16 हजार रुपयांचे सोने..

Chaitanya Machale

Shirur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास तसेच महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.

पुणे शहर, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे यांच्यासह डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या अर्जाबरोबर मालमत्तेचे शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून, यामध्ये उमेदवार तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती नमूद करण्यात आली आहे.

शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मालमत्तेत दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या पाच वर्षांत झाली असून, कोल्हे यांच्यावर तीन कोटी रुपयांचे कर्जदेखील आहे. कोल्हे यांच्याकडे आठ कोटी 12 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

त्यांच्या पत्नीकडे तीन कोटी 99 हजारांची मालमत्ता आहे. त्यांची एकूण संपत्ती 15 कोटी 62 लाख 57 हजार इतकी आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये खासदार कोल्हे यांच्या कुटुंबाची संपत्ती साडेचार कोटी होती. या वर्षी दाखल केलेल्या शपथपत्रात तीन कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्यावर असल्याचे शपथपत्रात म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे यांच्याकडे महागडी गाडी असून, त्याची किंमत सात लाख 42 हजार रुपये आहे. त्यांच्याकडे एक दुचाकीदेखील असून, तिची किंमत 1 लाख 74 हजार रुपये आहे, तर पत्नीकडे दोन लाख 67 हजारांची मोटार व 42 हजारांची दुचाकी आहे.

त्यांच्याकडे पाच लाख 16 हजारांचे सोने; तर पत्नीकडे 16 लाख 69 हजारांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे 40 हजार रुपयांची, तर पत्नीकडे 25 हजारांची रोख रक्कम आहे. त्यांची शेअर्समध्ये 14 लाख 87 हजारांची गुंतवणूक असून, 18 लाख 58 हजारांच्या मुदत ठेवी त्यांच्या आहेत. स्थावर मालमत्तेमध्ये कोल्हे यांच्याकडे नारायणगाव, कोल्हेमळा येथे वडिलोपार्जित सहा एकर 33 गुंठे जमीन आहे. त्याची किंमत 84 लाख 56 हजार रुपये इतकी आहे.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अब्जाधीश आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची 166 कोटी 51 लाख 86 हजार 348 रुपयांची संपत्ती आहे.

सुळे यांनी भाचे पार्थ पवार (Parth Pawar) आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्याकडून 55 लाख रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे. सुळे यांच्याकडे एक किलो ९२७ ग्रॅम, तर त्यांचे पती सदानंद यांच्याकडे 2 किलो 195 ग्रॅम सोने आहे.

त्याची बाजारातील किंमत 2 कोटी 14 लाख 97 हजार 873 रुपये आहे. सुळे आणि त्यांच्या पतीकडे 40 किलो 450 ग्रॅम चांदीदेखील आहे. सुळे यांच्या नावावर 9 कोटी 15 लाख 31 हजार 248, तर पती सदानंद सुळे यांच्या नावावर 4 कोटी 66 लाख 26 हजार 094 एवढी स्थावर मालमत्ता असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT