Lok Sabha Election News : पहिल्या टप्प्यातील 102 मतदारसंघांत 2019 मध्ये कुणाचा होता दबदबा?

NDA Vs India Alliance : लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडी अशी थेट लढत आहे. पहिल्या टप्प्यात सर्वांचेच लक्ष तमिळनाडूवर असणार आहे.
Election voting
Election votingSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election News) पहिल्या टप्प्यातील मतदान उत्साहात सुरू असून, पहिल्या चार तासांत अनेक ठिकाणी मतांची टक्केवारी 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना वगळता इतर राज्यांमध्ये मतदान सुरुळीतपणे सुरू आहे. एकूण 102 लोकसभा मतदारसंघांत आज मतदान होत असून, त्यापैकी सर्वाधिक 39 जागा तमिळनाडूतील आहेत. (Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी थेट लढत होत आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक जागा असून, 16 कोटींहून अधिक मतदार मतदानाचा (Voting) हक्क बजावणार आहेत. या टप्प्यांत निम्म्या जागा दोनच राज्यांतील आहेत. तमिळनाडूमध्ये 39 आणि राजस्थानमध्ये 12 जागांवर मतदान सुरू आहे.

Election voting
Lok Sabha Election 2024: मतदानाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नागरिकांना आवाहन, खास मराठीत ट्विट करत म्हणाले...

मागील निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये 102 जागांपैकी 45 जागा यूपीएने म्हणजे सध्याच्या इंडिया आघाडीने (India Alliance) जिंकल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक 38 जागा या एकट्या तमिळनाडूतील होत्या. या राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, इतर राज्यांमध्ये चांगली कामगिरी करत एनडीएने 102 पैकी 41 जागा मिळवल्या होत्या. त्यात एकट्या भाजपच्या (BJP) 40 जागा आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिला टप्पा इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. तमिळनाडूमध्ये आघाडीची कामगिरी कशी राहते, यावर भाजपचे 400 चे पारचे लक्ष्य अवलंबून असणार आहे. त्याचप्रमाणे राजस्थानमधील 12, उत्तर प्रदेशातील 8, मध्य प्रदेशातील 6, उत्तराखंडसह महाराष्ट्र आणि आसाममधील प्रत्येकी पाच जागांवरही आज मतदान होत आहे. मागील निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपने आघाडी घेतली होती.

त्याचप्रमाणे बिहार व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी तीन, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन, तर मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, पुद्दुचेरी, सिक्कीम, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार येथील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होत आहे. अनेक ठिकाणी भाजप आघाडीवर होते.

महाराष्ट्रात तीन जागा होत्या भाजपकडे

महाराष्ट्रात पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मागील निवडणुकीत त्यापैकी रामटेक मतदारसंघ शिवसेनेकडे तर चंद्रपूर मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता. नागपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यामध्ये या वेळी या मतदारसंघात कुणाची जादू चालणार याबाबत उत्सुकता आहे.

R

Election voting
Google Doodle : गुगलचा भारतीय लोकशाहीला अनोखा सलाम; मतदारांना प्रेरित करणारे गुगल चे 'डूडल' !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com