Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सुरू झाले आहे. सोमवारी सकाळ मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळी मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या लोकांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत या तीनही मतदारसंघात सर्वसाधारण सहा टक्के मतदान झाले.
मतदानाला सुरुवात झाली असली तरी काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तेथे नागरिकांची रांग लागली होती. या तीनही लोकसभा मतदारसंघात (Loksabha Constituency) ईव्हीएम बंद पडल्याचे समोर आले. बंद पडलेल्या मशीनमधील तांत्रिक दोष तातडीने दुरुस्त करण्यात आले.
त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Loksabha) वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या टिंगरेनगर, वडगावशेरी येथे ईव्हीएम बंद पडल्याच्या दोन घटना घडल्या.
टिंगरेनगर बूथ क्रमांक 132, 133 बंद झाले होते. 1 तास मशीन बंद पडल्याने मतदार रांगेत खोळंबले होते. या भागात असलेल्या एका शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम (EVM) मशीन बंद पडले होते. त्यामुळे काही वेळासाठी येथे मतदान थांबवण्यात आले होते. जिल्हा निवडणूक प्रशासनाने तातडीने या मशीनमधील दोष दूर केल्यानंतर येथील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Loksabha Election) तळेगाव दाभाडे येथील गणेश वाचनालयातील मतदान केंद्रामधील ईव्हीएम मशीन टेक्निकल एरर मुळे काही वेळासाठी बंद पडले होते. यावेळी नागरिकांना रांगेत थांबावे लागले.
मात्र कर्मचारी आणि प्रशासनाने लगेच कामाला लागते आणि त्यांनी मशीन दुरुस्त केले. दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण युनिट बदलावे लागले. आता येथील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातील मॉक पोलच्या वेळी 37 बॅलेट युनिट 13 कंट्रोल यूनिट आणि 17 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघातील 24 बॅलेट युनिट 6 कंट्रोल यूनिट आणि 14 व्हीव्हीपॅट यंत्र मॉक पोलचे वेळी बदलण्यात आले. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील 24 बॅलेट युनिट 8 कंट्रोल यूनिट आणि 24 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आली, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.