Ramdas Athawale, NDA Leaders Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election :...तर वेगळा मार्ग धरणार; नाराज रामदास आठवलेंचा महायुतीला इशारा

Ramdas Athawale News: "आम्हाला विश्वासात घेतलं जातं नाही. महायुतीत माझा फोटो छापला जात नाही, आमची मते मिळवायची असतील तर फोटो छापला पाहिजे. फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे."

Sudesh Mitkar

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केलं जात असून, महायुतीच्या या वागण्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शिवाय युतीला आमची गरज नसेल तर सोबत राहायचं की नाही? याबाबतचा निर्णय घेऊ, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी (Ramdas Athawale) महायुतीला दिला आहे. तसेच युतीत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते आज आठवले गटाच्या पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातील (Pune) बैठकीत आठवले म्हणाले, "काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे 12 वाजवायचे आहेत, म्हणून भाजपसोबत आलो आहोत. आम्हाल 2 जागा पाहिजेत. शिर्डी लोकसभेसा (Shirdi Lok Sabha) मिळाली तर मी उत्सुक असून, सोलापूरची (Solapur) जागाही मिळावी अशी इच्छा आहे. आमच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षासोबत चर्चा केली पण जागावाटपात आमचं नाव येत नाही. नव्या उमेदवारांचं नावं येतं, मात्र जुनी नावं येत नाहीत. सध्याची महायुती आरपीआयच्या पाठिंब्यामुळे झाली असून, रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे."

फडणवीसांनी आश्वासन पूर्ण केलं नाही

आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी बोलून दाखवत त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिलेल्या आश्वासनाची आठवण दिली. केंद्रात आणि राज्यात एक मंत्रिपद मिळेल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र त्यां,नी हे आश्वासन पूर्ण केलं नसल्याचं आठवले म्हणाले. ते म्हणाले, आम्हाला सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे. लोकसभेच्या 2 जागा द्याव्यात ही आमची आग्रही मागणी आहे. यासाठी आपण लवकरच फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

...तर वेगळा मार्ग धरणार

2012 मध्ये युतीची महायुती झाली ते आरपीआई मुंबईत सोबत आल्यानंतर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत आल्यामुळे ही महायुती झालेली नाही. मी केंद्रात मंत्री असल्याने आमचा पक्ष देशभरात वाढला आहे. नागालँडमध्ये आमचे दोन आमदार निवडून आले आहेत. 2 महामंडळ, 40 ते 50 कार्यकर्त्यांना DPDC मध्ये सभासदत्व मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक विधान परिषद आणि पुढील विधानसभेत 10-15 जागा राज्यात मिळाव्यात, अशी मागणी आठवले यांनी या वेळी केली. तसेच रिपब्लिकन पक्षाचा अपमान होत असेल तर वेगळा मार्ग धरावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचंही आठवले म्हणाले.

महायुतीला आमची गरज नसेल तर सोबत राहायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ असा इशारा देत ते म्हणाले, "आम्हाला विश्वासात घेतलं जातं नाही. तसेच महायुतीत माझा फोटो छापला जात नाही, आमची मते मिळवायची असतील तर फोटो छापला पाहिजे. फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे." दरम्यान, प्रकाश आंबेडकर बी टीम असतील तर आमची ए टीम आहे, असंही आठवले यांनी ठणकावून सांगितलं.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT