Lok Sabha Election: "माझ्या प्रचारासाठी भावाला..." अजितदादांच्या धावपळीवर सुप्रिया सुळेंची टोलेबाजी

Lok Sabha Election: " देशभरामध्ये छत्रपतींच्या गादीचा मान राखला जातो. उदयनराजे आमच्यासोबत होते तेव्हा त्यांचा मानसन्मान राखला जायचा, कोणत्याही बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिले असता त्यांची बसण्याची व्यवस्था शरद पवारांच्या शेजारी केली जायची."
Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दोन दिवस पुणे मुक्कामी आहेत. या वेळी त्यांनी बैठकांचा धडाका लावल्याचं पाहायला मिळत आहे. या वेळी पवारांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या शिवाय फोनवरून बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) उमेदवारासाठी काम करण्याची विनंती केल्याचं बोललं जात आहे. शिवाय अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या लोकसभेच्या याच धावपळीवर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. "दादा जेव्हा माझ्यासाठी प्रचार करत होते, तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत," असं वक्तव्य सुळे यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर आणि सांगलीच्या (Kolhapur and Sangli) जागांवरून वाद सुरू आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देशभरामध्ये पाचशेहून अधिक लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) एकत्रित येत असेल, तर काही जागांवरती वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये लोकशाही असून, सामंजस्याने याच्यावरती तोडगा काढण्यात येईल. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि काँग्रेसकडून ज्या पद्धतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेदेखील उमेदवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे लवकरच जाहीर करतील."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदयनराजेंना शरद पवारांनी मुलाप्रमाणे जीव लावला

छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी अद्याप भाजपकडून जाहीर करण्यात आलेली नाही, यावर बोलताना सुळे म्हणाल्या, ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. देशभरामध्ये छत्रपतींच्या गादीचा मान राखला जातो. उदयनराजे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांचा मानसन्मान राखला जायचा, कोणत्याही बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिले असता, त्यांची बसण्याची व्यवस्था ही शरद पवारांच्या (Sharad Pawar) शेजारी केली जायची. मुलाप्रमाणे उदयनराजेंना शरद पवारांनी जीव लावला. तेवढेच प्रेम आणि जिव्हाळा उदयनराजेंनीदेखील लावला. मात्र, भाजपकडून या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असून, त्याच्या वेदना होत असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule, Ajit Pawar
Sanjay Gaikwad: एकनाथ शिंदेंना धक्का; आमदार गायकवाड बुलडाणा लोकसभा लढवण्यासाठी सज्ज

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार हे कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचे काम करण्यासाठी संपर्क करत आहेत. तसेच दादा संपर्क करून धमकावत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्यात का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुळे म्हणाल्या, प्रश्न विचारण्यात येत आहेत. यातच सर्व काही आलं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे या आरोपांना दुजोरा दिला.

Supriya Sule, Ajit Pawar
Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, हात फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

बारामती (Baramati) मतदारसंघातील दादांच्या गाठीभेटीविषयी सुळे म्हणाल्या, देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणी कोणाच्या भेटीगाठी घ्यायच्या याचे स्वातंत्र्य असून, प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. त्यानुसार दादा भेटीगाठी घेत आहेत. मात्र, मला आनंद एकाच गोष्टीचा आहे की, दादा जेव्हा माझ्यासाठी प्रचार करत होते, तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत, याचे मला समाधान आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com