Vijay Shivtare, Sunetra Pawar, Mamta Landge-Shivtare Sarkarnama
पुणे

Vijay Shivtare News : शिवतारेंचा असाही यू टर्न; सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'तुम्ही दिल्लीला जा आम्ही...'

Baramati Lok Sabha Constituency And Sunetra Pawar : यापूर्वी सुनेत्रा पवारांनी भोर वेल्हेचे आमदार तथा महाविकास आघाडीचे नेते संग्राम थोपटे यांचीही भेट घेतली होती. मात्र, महायुतीत असूनही पवारांनी विजय शिवतारेंची भेट घेणे टाळले होते.

Sunil Balasaheb Dhumal

सागर आव्हाड

Baramati Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने बारामती लोकसभा मतदारसंघ कोणत्या ना कोणत्या करणाने कायम चर्चेत आहे. येथून खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयीमध्ये लढत होत आहे. मात्र, महाविकास आघाडीतील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शिंदे गटातील विजय शिवतारेंनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे अजितदादांचे टेन्शन चांगलेच वाढले होते. त्यांचे बंड थंड करण्यात वरिष्ठांना यश आले आहे. त्यानंतर सोमवारी (ता. 8) सुनेत्रा पवारांनी प्रथमच विजय शिवतारेंची भेट घेतली. Sunetra Pawar Meet Vijay Shivtare At Saswad.

पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुनेत्रा पवारांनी Sunetra Pawar शिवतारेंची सासवड येथील निवासस्थानी जात भेट घेतली. त्यांच्यात सासवडमधील जनसंवाद सभेच्या तयारीबाबत चर्चा झाली. या भेटीत तुम्ही दिल्लीला जा, आम्ही तालुका सांभाळू, असे म्हणत शिवतारेंनी सुनेत्रा पवारांचे लोकसभा निवडणुकीत काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, अजितदादांविरोधात बोलताना काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढणारच, असा त्यांनी पवित्रा घेतला होता. आता मात्र महायुतीचा धर्म पाळणार स्पष्ट करून शिवतारे यू टर्न घेतल्याचे बोलले जात आहे.

बारामतीतून Baramati उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत मिळताच सुनेत्रा पवारांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. यातून त्यांनी सहाही विधानसभा मतदारसंघांतील नेत्यांच्या भेटी-गाठी घेतल्या होत्या. निवडणुकीत सहकार्य मिळावे, यासाठी त्यांनी भोर वेल्हेचे आमदार तथा महाविकास आघाडीचे नेते संग्राम थोपटे Sangram Thopte यांच्याही भेट घेतली होती. मात्र महायुतीत असूनही पवारांनी विजय शिवतारेंची भेट घेणे टाळले होते. त्यानंतर शिवतारेंनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याचे जाहीर केले. यानंतर सुनेत्रा पवारांनी शिवतारेंची भेट घेत चर्चा केली आहे.

सासवड येथे झालेल्या उभय नेत्यांच्या भेटीवेळी शिवतारेंची मुलगी ममता लांडगे-शिवतारे यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शिवतारेंनी पवारांना 'तुम्ही दिल्लीत जा, आम्ही तालुका सांभाळू,' असे स्पष्ट केल्याचे समजते. या भेटीने शिवतारे पवारांना दिल्लीला पाठवण्यासाठी कशी रणनीती आखणार, पुरंदर विधानसभेतून सुनेत्रा पवारांना किती लीड मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT