Dharashiv Loksabha Constituency : धाराशिवमध्ये शिवसेना बंडाच्या तयारीत, सावंत यांचे पुतणे 25 हजार समर्थकांना घेऊन वर्षाच्या दिशेने !

Dhananjay Sawant will take the step of independent contest : उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचे पाऊल धनंजय सावंत उचलणार
Tanaji sawant - Dhananjay Sawant
Tanaji sawant - Dhananjay SawantSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : महायुतीतील घटक पक्षांमधील वादावादी काही संपेना. धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीने खेचून घेतल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट अचानक आक्रमक झाला आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेले पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय यांनी थेट उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानाकडे कूच केली आहे. तीन हजार गाड्यांतून पंचवीस हजार समर्थक घेऊन सावंत मुंबईकडे निघाले असल्याचे खात्रीलायक माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांनी धाराशिवची जागा शिवसेनेकडे घेऊन उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचे टोकाचे पाऊल धनंजय सावंत उचलण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आक्रमक झाला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडावी किंवा अर्चना पाटील यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tanaji sawant - Dhananjay Sawant
Beed Lok Sabha: बीडमध्ये घर बांधण्यासाठी वर्गणी जमा करा, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी धनंजय सावंत सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) महायुतीच्या नेत्यांना भेटण्यासाठी निघाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुक्यातील हजारो गाड्यांचा ताफा मुंबईला रवाना झाला आहे. लोकसभेसाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचा मोठा गाजावाजा करून भावी खासदार म्हणून जिल्हाभरात होर्डिंग लावण्यात आले होते. नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारी निश्चित होईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.

मात्र, अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादीने भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांकडेच नाराजी व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. जागा शिवसेनेकडे घ्या आणि उमेदवारी द्या, अशी मागणी सावंत आणि त्यांचे समर्थक शिंदेंकडे करणार आहेत.

Tanaji sawant - Dhananjay Sawant
Parbhani Loksabha Constituency : परभणीत प्रचार शिगेला, ठाकरे गटाच्या जाधवांवर गाणे...

दबाव वाढवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. पुतण्याच्या या आक्रमक पवित्र्याला तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा पाठिंबा आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धाराशिवमध्ये मशाल विरुद्ध बाण असाच सामना झाला पाहिजे, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. तरच आम्ही निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ, अन्यथा आम्ही निवडणुकीपासून लांब राहू, असा इशाराही धनंजय सावंत समर्थकांनी दिला आहे. धनंजय सावंत यांना तिकीट मिळावे यासाठी जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या सावंत समर्थकांचे हे दबावतंत्र किती कामाला येते? की त्यांच्यावरच उलटते हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited by : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com