Pune News : भारतीय जनता पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे ऊर्फ नाथाभाऊंनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर खडसे Eknath Khadse राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेवरील आमदारही झाले. आता मात्र नाथाभाऊ पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. यावर आता महाविकास आघाडीचे रावेर लोकसभेचे संभाव्य उमेदवार आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकनाथ खडसेंना भाजपत आत्ताच जावे, असे म्हणत डिवचले आहे. Eknath Khadse should not wait for rejoin BJP.
रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रक्षा खडसे Raksha Khadse यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून खल सुरू आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात रोहिणी खडसे यांना निवडणुकीत उतरवण्यात येणार का? अशाही चर्चा झडल्या आहेत.
दरम्यान, सोमवारी (ता. ८) पुण्यामध्ये शरद पवार Sharad Pawar यांच्या निवासस्थानी रावेर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर करणार आहे. रावेर लोकसभेसाठी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व रवींद्र पाटील हे दोघे दावेदार आहेत. मात्र तेथून संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संतोष चौधरी हे आपल्या कार्यकर्त्यांसह मोदीबागेत दाखल झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता एकनाथ खडसे भाजपत घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर 'सरकारनामा'शी बोलताना चौधरी म्हणाले, नाथाभाऊ यांनी पंधरा दिवसांची वाट न पाहता आत्ताच भाजपत जावे. जाताना तेवढा त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान चौधरींनी खडसेंना दिले आहे. सध्या जास्तीत जास्त सहानुभूती राष्ट्रवादी आणि ठाकरे गटास आहे. रोहिणी खडसेंनी Rohini Khadse घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे. सर्व जनता ही संतोष चौधरी व राष्ट्रवादीबरोबर असेल. त्यामुळे रावेरमधून उमेदवारी मिळाल्यास जास्तीत जास्त फरकाने विजय होणार आहे, असा विश्वासही चौधरींनी व्यक्त केला.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.