Supriya Sule News Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : 'डायनिंग टेबल-बंद खोलीतल्या गोष्टी काहीजण टीव्ही वर...'; सुळेंच्या निशाण्यावर फडणवीस!

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी संपर्क साधून आपल्याला मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती. तेव्हा वेळ निघून गेली आहे, असं आपण त्यांना सांगितलं, असे फडणवीस म्हणाले. यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून यावर राजकीय पडसाद उमटत आहेत. यावर आता खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेमध्ये फूट पडून जेव्हा एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुहवाटीला गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून तुम्ही मुख्यमंत्री व्हा, संपूर्ण पक्षात तुमच्या पाठीशी उभा करतो, अशी ऑफर दिली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माहित नाही सध्या ज्या गोष्टी डायनिंग टेबलवर, बंद खोलीमध्ये झाले आहेत, त्या गोष्टी अनेक जण टीव्ही वरती बोलत आहेत. मी अशा कोणत्याही मिटींगला नव्हते, त्यामुळे मला सांगता येणार नाही. मात्र मी जर कोणाशी व्यक्तिगत चर्चा केली तर ती मी बाहेर सांगत नाही. खूप गोष्टी मी मनात आणि पोटात ठेवू शकते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लागवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाणी प्रश्न -

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे प्रचार करत आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. विकासाच्या मुद्द्यावरून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्या वरती होत असलेल्या टीकेवर बोलताना त्या म्हणाल्या, "विरोधकांकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी काहीच मुद्दे नसल्याने ते सातत्याने माझ्यावरती विकासाच्या मुद्द्यावरतून टीका करत आहेत. यामध्ये ते सातत्याने बोलतात की गल्ली तो दिल्लीपर्यंत एकाच विचाराचे सरकार असल्यास विकास होतो. मात्र सध्या सोलापूर, सांगली मध्ये नगरपालिकेपासून ते खासदार पर्यंत एकाच पक्षाचे प्रतिनिधी आहेत. तरी देखील सोलापूरमध्ये 15 दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. सांगलीची परिस्थितीही वेगळी नाही. दुसरीकडे टीम वर्क म्हणून बारामती मध्ये आम्ही रस्ते, पाणी याबाबतच्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत.

दुष्काळावर भाष्य -

"बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघात 35 वर्ष अजित पवार हे आमदार आहेत. तर मी गेले वीस वर्षे खासदार आहे. आम्ही या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र काही भागांमध्ये अजूनही पाण्याची समस्या कायम आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दुष्काळाबाबत सरकारला विनंती करत आहे. मात्र सरकारकडून त्याबाबत दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दुष्काळाचे चटके बसत आहेत," असेही सुळे म्हणाल्या.

...म्हणून शरद पवारांवर टीका केली जाते -

लोकसभा निवडणुकीमध्ये सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येते. त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) फॅक्टर महत्त्वाचा आहे. आता विरोधक शरद पवारांना विरोधात षडयंत्र करत आहेत. शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण असल्याने विरोधकांकडून सातत्याने शरद पवारांना संपवण्याची भाषा केली जात आहे, असेही सुळे म्हणाल्या.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT