vasant more raj thackeray sarkarnama
पुणे

Vasant More On Raj Thackeray : राज ठाकरेंचं प्रेम आटलं? वसंत मोरेंचा कंठ दाटला, राजीनाम्याचे कारणच सांगितलं

Sunil Balasaheb Dhumal

वसंत मोरेंनी ( Vasant More ) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ( Raj Thackeray ) सुमारे 25 वर्षांपासूनची साथ मंगळवारी सोडली. राज ठाकरेंच्या फोटोसमोर दंडवत घालत माफी मागत वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा राम राम केला. त्यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी राज ठाकरेंबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

"मनसेतून बाहेर पडणे हा माझ्यासाठी खूप मोठा आणि अवघड निर्णय आहे. रात्रभर मला झोप नाही. काही जवळील कार्यकर्त्यांशी दीड-दोन तास चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आज सकाळी राजसाहेबांच्या फोटोला वंदन केले. त्यांना दंडवत घालून मी राजीनामा दिला," असं म्हणताना वसंत मोरेंना ( Vasant More ) अश्रू अनावर झाले. त्यांचा कंठ दाटून आल्याने काही वेळ त्यांना बोलता येत नव्हते. अशा स्थितीत त्यांनी राज ठाकरेंबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शिवसेनेत असल्यापासून मी राज ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. सुमारे २५ वर्षांपासून म्हणजे सर्व कारकीर्द त्यांच्यासोबत काम करत आहे. राजसाहेबांच्या ( Raj Thackeray ) हृदयात माझे स्थान होते. मात्र, काही लोकांनी त्या स्थानाला धक्का लावण्याचे काम केले. तसेच माझ्याबाबत चुकीची माहिती त्यांच्याकडे पोहोचवण्याचे काम सातत्याने झाले. त्याबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्यावरच कारवाई झाली. त्यामुळे आता गाऱ्हाणे मांडण्यात काही अर्थ नाही. त्यातूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला," असेही मोरेंनी स्पष्ट केले.

"राज्यात पक्षाची मोठी ताकद होती. 2017 मध्ये पुण्यात मनसे दुसऱ्या क्रमांकावर होता. मग आताच असे काय झाले, की शहरात पक्ष संघटना कमकुवत झाली? राज्यात मनसे वाढवायची असेल तर निवडणूक लढवली पाहिजे, असा माझा हेतू आहे. गेल्या दीड वर्षापासून लोकसभेची तयारी करत होतो. मात्र, पुण्यातून लोकसभा लढवण्यास मनसेला अनुकूल वातावरण नाही, असा रिपोर्ट दिला. हा रिपोर्ट माझ्यावर कुरघोडी करण्याचाच प्रयत्न आहे," असा आरोप मोरेंनी केला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT