ajit pawar vijay shivtare sarkarnama
पुणे

Vijay Shivtare On Ajit Pawar : "देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती जिंकणार नाहीत," शिवतारेंची दर्पोक्ती

Vijay Shivtare Latest News : "लोकसभेला पवार विरुद्ध बारामतीतील सर्वसामान्य माणूस अशी लढाई असणार आहे," असं शिवतारेंनी सांगितलं.

Akshay Sabale

पुणे : 13 मार्च | "देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार हे (अर्थात, अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार) बारामतीतून जिंकू शकणार नाहीत. कारण, त्यांचा उर्मटपणा...याला पाडा...त्याला पाडा...हे बरे नसते... अशी जळजळीत भाषा करीत शिवसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याचा इरादा पक्का केला. एक हजार टक्के मी निवडणूक लढणार असल्याचेही शिवतारेंनी छातीठोकपणे सांगण्याचा प्रयत्न केला. निवडणूक लढण्याची भूमिका स्पष्ट करताना शिवतारेंनी अजितदादांवर जहरी टीका केली. त्यामुळे अजितदादा-शिवतारेंमधील राजकीय वैर वाढल्याचे स्पष्ट आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) म्हणाले, "बारामती मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही. त्यामुळे पवार..पवार करण्याऐवजी निश्चितच आपण लढलं पाहिजे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार हा राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक हितासाठी प्रचार केला नव्हता."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"अजित पवारांनी उर्मट भाषा केली"

"पण अजित पवारांनी सभ्येतीची नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावती रुग्णालयात दाखल होतो. मी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून विधानसभेचा प्रचार केला. तेव्हा अजित पवारांनी पालखीतळावरून सांगितलं, 'मरायला लागला आहे, तर कशाला प्रचार करताय? लोकांची सहानुभूती घेण्यासाठी खोटं बोलत आहात.' माझ्या गाडीच्या नंबरपर्यंत खालच्या स्तरावर अजित पवार आले. राजकारणात निवडून आणण्यासाठी सकारात्मक प्रवृत्ती असावी. तेव्हा अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती," असं टीकास्र शिवतारेंनी सोडलं.

"अजित पवारांची गुर्मी तशीच"

"मी अजित पवारांना माफ केलं आहे. महायुतीत आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. पण, तरीही अजित पवारांची गुर्मी तशीच होती. दौंडमधील नागरिकांनी म्हटलं की, 'अजितदादा उर्मट आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंना मतदान करणार आहे'," असं शिवतारेंनी सांगितलं.

"अजित पवारांची विश्वाससार्हता संपली"

"पुरंदरचे लोक बदला घेण्याबद्दल बोलत आहेत. पण, नियती बदला घेईल. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर अजित पवारांची विश्वाससार्हता संपली होती. त्यामुळे बारामती मतदारसंघातील घराणेशाही आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना निवडणुकीचा हक्क मिळण्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार," असा निर्धार शिवतारेंनी व्यक्त केला.

"आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवारांची मानसिकता"

"पवार विरुद्ध बारामतीतील सर्वसामान्य माणूस अशी ही लढाई असणार आहे. सर्वांना पवारांनी त्रास दिला आहे. भोरचे अनंतराव थोपटे 1999 मध्ये मुख्यमंत्री झाले असते. पण, त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अजित पवारांनी होऊ दिलं नाही. आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवारांची मानसिकता आहे. लोकसभेला हर्षवर्धन पाटलांकडून मतदान करून घ्यायची आणि विधानसभेला त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्यात आले. अशा प्रकारची फसवेगिरी करण्यात आली. जन्मजात लोकांना फसवणे हा त्यांचा अधिकार आहे," असा हल्लाबोलही शिवतारेंनी अजित पवारांवर केला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT