Ajit Pawar On Vijay Shivtare : "बदला घेण्याची वेळ आलीय", शिवतारेंचा इशारा अन् अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar Latest News : "यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला एक नवा मार्ग दाखवला आहे. त्याच मार्गानं आपण पुढं गेलं पाहिजे," असं आवाहन अजित पवारांनी केलं.
Vijay Shivtare ajit pawar
Vijay Shivtare ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

अजित पवार महायुतीत सामील झाले आहेत. तरी, शिवसेना नेते विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यातील संघर्ष कमी होण्याचं नाव घेत नाही. अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय, असा इशारा विजय शिवतारेंनी रविवारी ( 10 मार्च ) दिला होता. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता शिवतारेंच्या विधानावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. "राजकारणात सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवला पाहिजे," असं अजित पवारांनी म्हटलं.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अजित पवारांनी प्रीतिसंगम येथील समाधीस्थळी अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवार ( Ajit Pawar ) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, "त्यांच्या ( शिवतारेंच्या ) विधानाबद्दल मला काहीच बोलायचं नाही. राजकारणात सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवला पाहिजे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवार निर्णय घेतला जाईल. महायुतीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल अशा प्रकारची वक्तव्य करू नये."

Vijay Shivtare ajit pawar
Sharad Pawar News: "दिलीप बनकर हे तर गद्दार, शरद पवारांचा फोटो वापरल्यास...", राष्ट्रवादीचा इशारा

"राजकारणात सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा, सांभाळायचा आणि त्याच पद्धतीनं कामकाज करायचं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपपंतप्रधान असताना उभ्या महाराष्ट्राला दाखवलं. तोच आदर्श आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे. ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"अलीकडे वाचाळविचारांची संख्या वाढली आहे. कोण कुणाला खेकडा, तर कुणाला वाघ म्हणतो. अशा गोष्टी खरेतर थांबल्या पाहिजेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला एक नवा मार्ग दाखवला आहे. त्याच मार्गानं आपण पुढं गेलं पाहिजे," असं आवाहन अजित पवारांनी केलं.

Vijay Shivtare ajit pawar
Sangli Lok Sabha 2024: भाजपच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट? सांगलीसाठी नवीन पाच नावे समितीकडे...

"आज दिल्लीत जागावाटपाबद्दल कोणतीही बैठक होणार नाही. सोमवारी बैठक होणार होती. पण, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं ती पुढं ढकलली आहे. जागावाटपाबद्दल तिन्ही पक्षांत प्राथमिक चर्चा झाली आहे. साधारण प्रत्येकाचा मान-सन्मान राखला जाईल आणि कार्यकर्त्यांना समाधान वाटेल, अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे," असं अजित पवारांनी सांगितलं.

Vijay Shivtare ajit pawar
Nanded Congress News : नांदेड काँग्रेसची धुरा आता बेटमोगरेकर, कदमांच्या खांद्यावर

विजय शिवतारे काय म्हणाले होते?

"सासवडमधील पालखी तळावर अजित पवारांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. त्या अपमानासाठी अजित पवार इथे येऊन माफी मागणार का? बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे," असं विजय शिवतारेंनी म्हटलं होतं.

R

Vijay Shivtare ajit pawar
Satara Loksabha News : शिंदेंचा शिलेदार करणार इच्छुकांची अडचण; कोणाला बसणार फटका..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com