Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : शिरूर आणि मावळमध्ये का नाही झाल्या आतापर्यंत महिला खासदार?

Shirur Maval Lok sabha Election 2024 : या ठिकाणी नवनीत राणासारख्या सेलिब्रिटी महिला नसल्याने त्या अपक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळचे शिरूरला सहा महिला अपक्षांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

Uttam Kute

Pune News : देशाच्या लोकसंख्येत म्हणजे मतदारांमध्ये निम्म्या महिला आहेत. मात्र, त्या तुलनेत महिला खासदार नाहीत. शिरूर आणि मावळ (जि.पुणे) हे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाहीत. या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत एकही महिला खासदार झालेली नाही. (Latest Marathi News)

शिरूर म्हणजे 2009 पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघामध्ये 67 वर्षांत महिला खासदारच झालेली नाही. तर, 2009 च्या पुनर्रचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या मावळमध्येही आतापर्यंतचे तिन्ही खासदार हे पुरुषच झालेले आहेत. या दोन्ही ठिकाणचे खासदार मुख्य आणि मोठ्या राजकीय पक्षांचेच राहिलेले आहेत. या ठिकाणी नवनीत राणासारख्या सेलिब्रिटी महिला नसल्याने त्या अपक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाही. त्यामुळचे शिरुरला सहा महिला अपक्षांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

थोडक्यात युती आणि आघाडीत सामील असलेल्या आताच्या राज्यातील मुख्य आणि मोठ्या पक्षांनी व पूर्वीच्याही पक्षांनी खेडनंतर शिरूरमध्ये महिला उमेदवार देण्यात अन्याय केलेला आहे. त्याची री मावळमध्ये त्यांनी गेल्या दहा वर्षांतओढली. एकंदरीत ही स्थिती पाहता 2029 वा त्यानंतरच शिरुर आणि मावळमध्ये महिला खासदार होण्याची शक्यता आहे. कारण आता होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही तेथे कुणी प्रमुख उमेदवार महिला नाही. अपक्ष म्हणून त्या रिंगणात आहेत. मात्र, निवडून येण्याची त्यांची सुतराम शक्यता नाही.

सध्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थात 33 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे तेथे त्यांना लोकसंख्येच्या हिशोबात नाही, पण ३३ टक्के वाटा मिळतो आहे. लोकसभेलाही तेवढाच देण्याचे बिल संसदेच्या विशेष अधिवेशनात यावर्षी पास झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ही 2029 पासून होणार आहे. त्यावेळी मात्र मोठ्या राजकीय पक्षांना या दोन ठिकाणीच नाही, तर राज्यासह देशभर महिला उमेदवार द्याव्या लागणार आहे. त्यातून मावळ आणि शिरूरला (Shirur) पहिला महिला खासदार होण्याची आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळे महिलांशी निगडित समस्या महिला खासदार या तुलनेने अधिक प्रभावी संसदेत मांडू शकणार आहेत.

शिरूरमध्ये, तर महिला आमदारच नाही -

खासदार सोडा, शिरूरमधील सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या एकही महिला आमदार नाही. तर, मावळमध्ये फक्त एक आहे. त्या ही गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आलेल्या आहेत. एकही आमदार नसणे, याची मोठ्या राजकीय पक्षांना ना खेद ना खंत आहे. त्यामुळे खासदारकीचे आरक्षण 2029 नंतर मिळणार असले, तरी त्याचा पाया या लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महाराष्ट्रात रचला जावा, अशी महिला मतदारांची त्यातही शिरूरमध्ये मागणी आहे. कारण तेथे एकही महिला आमदार नाही. तर, मावळमध्ये एकाच्या दोन महिला आमदार व्हाव्यात, अशी तेथील महिला मतदारांचीही इच्छा आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT