Maval Lok Sabha Constituency : 'मावळ'मध्ये पाच दिवसांत 66 जणांनी 125 अर्ज नेले, पण त्यापैकी...

Maval Lok Sabha Constituency : मावळमध्ये महायुतीच्या बारणेंनी चार उमेदवारी अर्ज भरले,तर आघाडीचे वाघेरे दोन अर्ज भरणार
Sanjogh Waghere, Shrirang Barne
Sanjogh Waghere, Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्यात 13 मे रोजी मावळ मध्ये मतदान होणार आहे.त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 18 एप्रिलपासून सुरुवात झाली. गेल्या पाच दिवसांत 66 जणांनी सव्वाशे अर्ज नेले. मात्र, त्यातील फक्त चौघांनीच आतापर्यंत ते दाखल केले आहेत.

मावळमध्ये पहिल्या दिवशी एकानेही उमेदवारी दाखल केली नाही.दुसऱ्या दिवशी (ता.19) कर्जत येथील यशवंत विठ्ठल पवार (कर्जत, क्रांतिकारी जय हिंद सेना) यांनी ती दाखल केली. तर,त्यानंतर दोन दिवस पुन्हा पाटी कोरी राहिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Srirang Barne Wealth : 'मावळ'मधील महायुतीचे दहावी पास उमेदवार बारणे अब्जाधीश!

सोमवारी महायुतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग चंदू बारणे (थेरगाव,पिंपरी-चिंचवड),प्रशांत रामकृष्ण भगत (उरण, भारतीय जवान किसान पार्टी) आणि इंद्रजीत डी. गोंड (खोपोली, अपक्ष)अशा तिघांनी उमेदवारी अर्ज भरले.त्यामुळे पाच दिवसांत ते दाखल करणाऱ्यांची संख्या चार झाली. अर्जात त्रूटी राहिली,तर सावधगिरीचा उपाय म्हणून चार अर्ज बारणेंनी भरले आहेत.

दरम्यान, सोमवारी एकूण 17 जणांनी 33 अर्ज नेले. आजपर्यंत गेल्या पाच दिवसांत 66 व्यक्तींनी 125 अर्ज नेले आहेत. सोमवारी आघाडीचे (ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील (पिंपरी) यांच्यासह त्यांची पत्नी उषा यांनीही तो नेला. त्याही सावधगिरीचा उपाय म्हणून तो भरणार आहेत.

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Kolhe Vs Aadhalrao News : केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता, आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय, कोल्हेंचे प्रत्युत्तर !

कालच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेल्या कर्जत येथील माधवी नरेश जोशी तसेच रायगड येथील बहूजन समाज पार्टीचे राजाराम नारायण पाटील यांच्यासह बहूतांश अपक्षांनी उमेदवारांनीही आज अर्ज नेले. आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उद्या (ता.23) वाघेरेंनी अर्ज दाखल केल्यावर जाहीर सभा होणार असल्याचे मावळ लोकसभेचे शिवसेनेचे प्रचारप्रमुख योगेश बाबर यांनी आज सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com