Ajit Pawar and Dr. Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Dr. Amol Kolhe: अजितदादांच्या चॅलेंजवर अमोल कोल्हेंचं सूचक विधान; म्हणाले, 'खासगीत बोलणं...'

Ajit Pawar and Dr. Amol Kolhe: अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण आता पाडणारच, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना चॅलेंज

Ganesh Thombare

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. 'पाच वर्षांत एका खासदाराने जर त्यांच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. मतदारसंघाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटलांनी जीवाचं रान केलं होतं. पण आता मी तिथे दिलेला उमेदवार निवडूनच आणून दाखणार', असे थेट आव्हान अजित पवारांनी खासदार कोल्हेंना दिले. यावर खासदार अमोल कोल्हेंनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

'एकत्र पक्ष असताना या सर्व लोकांचं सहकार्य होतं. मी ताकाला जाऊन भांडे लपवणार नाही. परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही. वस्तुस्थिती ही आहे की, या दोघांनीही मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले', असं म्हणत कोल्हेंनी अजित पवार आणि वळसे-पाटलांनी (Dilip Walse Patil) मदत केल्याचे मान्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार म्हणतायेत की तुमच्या विरोधात तगडा उमेदवार देणार ? या प्रश्नावरही कोल्हेंनी भाष्य करत 'दादा मोठे नेते आहेत, इतक्या मोठ्या नेतृत्वांबद्दल काही बोलणं योग्य नाही. मी फार लहान कार्यकर्ता आहे. यापुढे मी माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला वाटत नाही की दादांबद्दल मी काही प्रतिक्रिया द्यावी', असं म्हणत यासंदर्भात अधिक बोलणे कोल्हेंनी (Dr. Amol Kolhe) टाळले.

पाच वर्ष मतदारसंघाकडे फिरकला नाहीत, या अजित पवारांच्या टीकेवर कोल्हे म्हणाले, 'अजितदादांनीच अनेकवेळा माझं कौतुक केलं आहे. यामध्ये काही मिस कम्युनिकेशन झालं असेल. मग अगोदर काम केलं नसतं तर कोरोनाकाळात एवढं मोठं लसीकरण झालं नसतं. पण अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यांला मी उत्तर द्यावं, असं मला वाटत नाह, असे अमोल को'ल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, पवारसाहेबांच्या नेतृत्वात काम करत राहणार असून निवडणूक हे एक माध्यम तर सत्ता हे साधन आहे. सत्ता येते जाते. मात्र, काम करत राहणं गरजेचं आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जे काही खासगीत बोलणे झाले ते चार चौघात सांगणे मला योग्य वाटत नाही. जर सांगायचे झाले तर सर्वच सांगावे लागेल, अशी सूचक प्रतिक्रियाही खासदार कोल्हेंनी अजित पवारांनी केलेल्या टीकेवर बोलताना दिली.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT