Ajit Pawar : अजितदादांचं अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज; शिरूरमधील उमेदवारीबाबत मोठं विधान...

Dr. Amol Kolhe : खासदार कोल्हे शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
Amol Kolhe-Ajit Pawar
Amol Kolhe-Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांचे उमेदवार कोण असणार, याबाबत जोरदार खल सुरू आहे. दोन्ही गटांतील इच्छूकांकडून मतदारसंघात शड्डू ठोकले जात आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हेही तयारीला लागले आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. अजितदादांनी शिरूरमधील निवडणुकीबाबत मोठे विधान केल्याने कोल्हे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत किल्ले शिवनेरी ते पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. त्यावर बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) कोल्हे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पाच वर्षे मतदारसंघात लक्ष दिले असतं तर बरे झाले असते. एक खासदार दीड वर्षापूर्वी माझ्याकडे राजीनामा द्यायचा आहे, असे म्हणत आला होता. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली. निवडून आणण्यासाठी जीवाचे रान मी आणि दिलीप वळसे-पाटलांनी केले आहे. (Shirur Lok Sabha Constituency)

Amol Kolhe-Ajit Pawar
Lok Sabha Election: 'महाविकास आघाडी लोकसभेच्या 35 ते 40 जागा जिंकेल'; संजय राऊतांचा मोठा दावा

मधल्या काळात ते सहाही मतदारसंघात फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, अशी टीका पवारांनी केली. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागला आहे. शिवाजी महाराजांवर काढलेला एक चित्रपट अजिबात चालला नाही. एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टीवर परिणाम होत असल्याचे सांगत होते. पण यावर कधी बोलणार नव्हतो, पण आता ह्यांना उत्साह आला आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे पदयात्रा, संघर्ष यात्रा सुचतेय, असा टोला अजित पवारांनी लगावला.

तुम्ही पदयात्रा काढा, मीही सहा तालुक्यांत सांगतो, कशा पद्धतीने यांची भूमिका होती आणि किती वेळा तुम्ही त्यांना मतदारसंघात पाहिले? त्यावेळी उमेदवारी देताना योग्यपध्दतीने दिली होती. पण नंतरच्या काळात ते पहिल्या दोन वर्षातच ढेपाळले. आम्ही चित्र बघून, जनाधार बघून उमेदवारी देतो. ते वक्ते उत्तम आहे, कलाकार चांगले आहेत. संभाजी महाराजांची भूमिका चांगली केली आहे. नागरिक, महिलांना खिळवून ठेवण्याचे काम त्यांनी केले. आता मी तिथे दिलेला उमेदवार निवडूनच आणून दाखवेन, असे थेट आव्हान पवारांनी कोल्हे यांना दिले आहे.

Amol Kolhe-Ajit Pawar
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर ठरवणार लोकसभेचा 'रोडमॅप' ? राज्य कमिटीची तातडीची बैठक बोलावली

ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी माझ्यासोबत यावे. दुटप्पी भूमिका घेऊ नका. मी सांगायचे काम कार्यकर्त्यांना केले आहे. माझ्यादृष्टीने मला जे योग्य वाटत ते मी घेण्यास मला मुभा आहे, इतरांनी मला टोकायचे काही कारण नाही, असेही पवार म्हणाले.

 (Edited By - Rajanand More)

Amol Kolhe-Ajit Pawar
Sangamner: मंत्री विखे गटाची सत्ता असलेल्या आश्वी गावात मोठी वृक्षतोड; ग्रामस्थांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com