Shirur-Baramati Lok Sabha : अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघात चार दिवस ‘आक्रोश’

Dr. Amol Kolhe : 27 डिसेंबर रोजी किल्ले शिवनेरीपासून शेतकरी आक्रोश मोर्चा...
Dr Amol Kolhe, Supriya Sule
Dr Amol Kolhe, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्व विद्यमान आणि इच्छूक उमेदवारांकडून विविध माध्यमातून मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कंबर कसली आहे. शेतकरी, बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांमधील गैरप्रकार असे मुद्दे घेत दोन्ही मतदारसंघात शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

शेतकरी आक्रोश मोर्चा 27 डिसेंबर रोजी किल्ले शिवनेरीपासून (Shivneri) काढण्यात येणार असून 30 डिसेंबरला पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. याच मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) खासदार कोल्हेंवर (Amol Kolhe) आज जोरदार टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे काहींना पदयात्रा, संघर्ष यात्रा सुचत आहेत, असे म्हणत मी दिलेला उमेदवार निवडून आणणारच, असे आव्हानही पवारांनी दिले.

Dr Amol Kolhe, Supriya Sule
Ajit Pawar : अजितदादांचं अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज; शिरूरमधील उमेदवारीबाबत मोठं विधान...

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी मोर्चाबाबत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. 'आता रडायचं नाही लढायचं, आपल्या हक्काचं लढून मिळवायचं' असे त्यांनी म्हटले आहे. लहरी निसर्गामुळे, तुघलकी सत्तेमुळे मरणाच्या दारात उभा असलेल्या शेतकऱ्याचा, सरकारी नोकऱ्यांमधील गैरप्रकारांमुळे, वाढत्या बेरोजगारीमुळे अंधकाराच्या डोहात ढकलला गेलेल्या तरुणांचा, अन्यायाने ग्रस्त असलेल्या तमाम जनतेचा हा 'आक्रोश' आहे, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आक्रोश सत्ताधाऱ्यांच्या कानापर्यंत पोचवण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. हा मोर्चा किल्ले शिवनेरी, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, केंदुर, शिक्रापूर, मांडवगणा, निर्वी, दौंड, इंदापूर, बारामती, उरुळी कांचन, हडपसर आणि जिल्हाधिकारी कार्यालय, असा शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. 

Dr Amol Kolhe, Supriya Sule
Nagar Politics : संगमनेरला चांगल्या बॅट्‌समनची गरज, फिल्डिंगचं माझ्यावर सोडा; विखेंनी पुन्हा थोरातांना डिवचलं

काय म्हणाले अजित पवार?

तुम्ही पदयात्रा काढा, मीही सहा तालुक्यांत सांगतो, कशा पद्धतीने यांची भूमिका होती आणि किती वेळा तुम्ही त्यांना मतदारसंघात पाहिले? त्यावेळी उमेदवारी देताना योग्य पध्दतीने दिली होती. पण नंतरच्या काळात ते पहिल्या दोन वर्षांतच ढेपाळले. आम्ही चित्र बघून, जनाधार बघून उमेदवारी देतो. ते वक्ते उत्तम आहे, कलाकार चांगले आहेत. संभाजी महाराजांची भूमिका चांगली केली आहे. नागरिक, महिलांना खिळवून ठेवण्याचे काम त्यांनी केले. आता मी तिथे दिलेला उमेदवार निवडूनच आणून दाखवेन, असे थेट आव्हान अजित पवारांनी कोल्हे यांना दिले आहे.

(Edited By – Rajanand More)

Dr Amol Kolhe, Supriya Sule
Pune Political News : जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सुप्रियाताईंना फडणवीसच दिसतात !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com