Shirur Loksabha News : शिरूर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीतील दिग्गज उमेदवारांत लढत होत आहे. दोन्ही दिग्गजांकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी उडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार व उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत होत असताना माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता शरद पवारांच्या विचाराने चालत आहे. हे जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांना गेट वेल सुन, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. अजित पवारांनी या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हेंना आसमान दाखविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून तगडा व अनुभवी उमेदवार त्यांनी या मतदारसंघातून दिला आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर जोरदार टीका होत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार बॅटिंग केली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभेची निवडणूक मायबाप जनतेने हातात घेतली आहे. सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान डिवचणाऱ्या महायुतीच्या विरुद्ध जनता अशा या लढतीची ही निवडणूक आहे. आजपर्यंत खासदार शरद पवारांनी केलेली विकासकामं जनतेच्या काळजावर कोरलेली आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी या मतदारसंघात ही लढत असताना माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता शरद पवारांच्या विचाराने चालत आहे, हेच जर कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांना ‘गेट विल सुन’... असा सल्ला त्यांनी दिला.
कोल्हे म्हणाले, शरद पवारांबद्दल Sharad Pawar आदर असेल तर यापूर्वी शरद पवारांवर आपण काय विधानं करत कुणाला आव्हानं दिले, हे कोणीही विसरत नाही. त्यामुळे आपण या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नाविषयी बोलूया. आरोप प्रत्यारोप या गोष्टी होत राहतील. शरद पवारांच्या विचाराने पुढे जाताना मायबाय जनतेने मला स्वीकारले आहे. मायबाप जनतेला गद्दारी आवडत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागरिकांचे दिलेले शब्द पूर्ण केलेत या वास्तवातल्या गोष्टी आहेत. दिलेले शब्द पूर्ण केलेत चंदेरी दुनियेची स्वप्न नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागच्या पंधरा वर्षांत आम्ही आश्वासन ऐकलं त्या गोष्टी आता पूर्ण होतात. शरद पवारांना सर्वच ठिकाणावरून मिळणारा प्रतिसाद पाहता सर्वांच्याच उरात धडकी भरलीय आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.