Maval Lok Sabha Constituency: शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; पण मावळमध्ये आणखी एका 'कोल्हें'चा शोध संपेना !

Political News: शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचं ठरलं; पण मावळात काय?
Maval Lok Sabha Constituency
Maval Lok Sabha ConstituencySarkarnama

Pimpri-Chinchwad News : लोकसभेची निवडणूक अकरा महिन्यांवर आल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच बैठका काढू लागले आहेत. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघांचा आढावा घेत शिरूरसारख्या ठिकाणी उमेदवारही नुकताच नक्की केला. पण 'मावळ' लोकसभेत त्यांचा हा संभ्रम कायम आहे. तेथे ते 'अमोल कोल्हें'च्या शोधात आहेत.

'शिरूर' हा शिवसेनेचा अभेद्य गड गतवेळी २०१९ ला डॉ.अमोल कोल्हेंसारखा अभिनेता असलेला नवीन उमेदवार देऊन राष्ट्रवादीने सर केला. त्यातून खासदारकीचे हॅटट्रिक केलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे २०२४ ला ही पुन्हा डॉ.कोल्हेंनाच उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे. मात्र, मावळात त्या आघाडीवर त्यांची शांतता आहे.

Maval Lok Sabha Constituency
NCP's MLA Will Increase : होय, राष्ट्रवादीचे १० ते २० आमदार वाढतील; शिंदे गटाच्या नेत्याची कबुली

गतवेळी तेथे पवार कुटंबाला प्रथमच पराभवाचे तोंड पहावे लागले. अजित पवारांचा मुलगा पार्थ पराजित झाले. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी तेथे ताकही फुंकून पिणार आहे. कारण ज्यांनी तो पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा निवडून आले ते श्रीरंग बारणे हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. त्यांनी आपणच २०१४ ला पुन्हा मावळात लोकसभेचे उमेदवार असल्याचे जाहीरच केले नाही, तर पुन्हा निवडून येणार असल्याचा दावाही ठोकला आहे.

जनसंपर्काच्या जोरावर विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यात त्यांना गतवेळसारखी भाजपची पुन्हा साथ मिळणार आहे. त्या जोडीला मोदी फॅक्टरही आहेच. त्यातूनच त्यांनी समोर कोणीतरी उमेदवार असेल, पण मीच खासदार पुन्हा होईल, असे ओव्हर कॉन्फिडन्स विधान केले आहे.

Maval Lok Sabha Constituency
Shirur Lok Sabha Constituency : आता 'शिरूर'मधून पैलवान आमदार महेशदादांनीही थोपटले दंड, आढळरावांचे काय होणार?

पहिल्यापासून मावळ लोकसभेत शिवसेनाच निवडून येत आहे. गजानन बाबर हे या मतदारसंघाचे पहिले खासदार, तर बारणे हे दुसरे आणि तिसऱ्या टर्मला आहेत. आघाडीच्या जागावाटपात मावळची जागा पुन्हा राष्ट्रवादीकडे घेऊन गत पराभवाचा वचपा काढायची मागणी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्य़ा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईतील या मतदारसंघाच्या आढावा बैठकीत केली.

त्याचवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार ठरल्यात जमा असल्याने आपला उमेदवार विजयी होण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून तो लवकर जाहीर करण्याचा आग्रहही त्यांनी यावेळी धरला. मात्र, त्यानंतरही तेथील उमेदवारीवर त्या बैठकीत चर्चा झाली नाही. तो ठरला नाही. कारण शिवसेनेचा मावळचा गड सर करेल, असा तगडा उमेदवार सध्या तरी राष्ट्रवादीकडे नाही.

Maval Lok Sabha Constituency
Pune News: अहिल्याबाईंच्या जयंतीसाठी सिद्धरामय्यांना बारामतीत आणा; बारामतीतील कार्यकर्त्यांचा शरद पवारांकडे आग्रह

२०१९ ला शिरूरचा शिवसेनेचा गड पक्षाला जिंकून देणारे डॉ.अमोल कोल्हेंसारख्या उमेदवाराच्या शोधात ते मावळमध्ये आहेत. दरम्यान, आतापर्यंत मावळात हारलेले पक्षाचे उमेदवार हे घाटावरील असल्याने तो डॉ.अमोल कोल्हेंसारखा घाटाखालील हुकमी एक्का देण्याची खेळी ते यावेळी करू शकतात.

गेल्या पाच वर्षात मावळमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. ती बऱ्याचअंशी आघाडी तथा राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारी आहेत. मे २०१९ नंतर ऑक्टोबर २०१९ ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा मावळ विधानसभा हा बालेकिल्ला हा राष्ट्रवादीने उध्वस्त केला. तेथे त्यांना सुनील शेळके यांच्यारुपाने डॉ.अमोल कोल्हे मिळाले.

Maval Lok Sabha Constituency
Jejuri Temple Trust Dispute : विश्वस्त निवडीचा वाद चिघळणार; जेजुरी बंदचा निर्णय दोन दिवसात

त्यांनी गेल्या साडेतीन वर्षात दमदार कामगिरी करीत नगरपालिका, ग्रामपंचायत, बाजार समितीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे. त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला लोकसभेला होणारच आहे. 'मावळ'च्या पिंपरी या दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातही पक्षाचेच आमदार अण्णा बनसोडे आहेत. तर चिंचवड या घाटावरील तिसऱ्या मतदारसंघातही त्यांची चांगली ताकद आहे.

दुसरीकडे दुभंगलेल्या शिवसेनेतील ठाकरे गटाची साथही त्यांना मिळणार आहे. या जमेच्या बाजू असल्या, तरी तयारी करण्याकरिता तेथे लवकर उमेदवाराची घोषणा पदाधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे शिरूरसारखी केली, तर २०२४ ला त्यांना आशा धरण्यास हरकत नाही. दुसरीकडे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तेथील क्लेम ठाकरे गट सोडून ती जागा राष्ट्रवादीला देईल का? हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com