Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : महाविकास आघाडीकडून बारामतीच्या उमेदवारीची घोषणा, तर अजित पवार म्हणाले...

Baramati Lok Sabha Constituency : शरद पवार यांनीच शिक्कामोर्तब करत बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Sudesh Mitkar

Loksabha Election 2024 News : महाविकास आघाडीकडून भोर विधानसभा मतदारसंघात शनिवारी जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर केला आहे. यानंतर महायुतीकडून बारामतीच्या उमेदवाराची घोषणा कधी होते, याची सर्वांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अजित पवारांनीच माहिती दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक हायव्होल्टेज ड्रामा बारामती मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामतीमध्ये लोकसभेच्या माध्यमातून पवार कुटुंबीय आमने-सामने उभे ठाकणार आहेत. या लढाईमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित होतं, त्यावर शरद पवार यांनीच शिक्कामोर्तब करत बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे दौऱ्यादरम्यान विचारले असता अजित पवार म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याचे मी स्वागत करतो. जो तो पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे घोषित करू शकतो. आम्ही महायुती म्हणून 48 जागांबाबत निर्णय झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित मिळून उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत.

याशिवाय शिरूरमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याबाबत अजित पवारांना विचारला असता पवार म्हणाले, दिवसात तुम्हाला शिरूरच्या उमेदवारीबाबत समजेल माध्यमांमध्ये बहुतांश बातम्या खऱ्या असतात तर काही बातम्यांना कोणताही आधार नसतो. दोन दिवसातच तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट होईल.

उद्या कॅबिनेटची बैठक असून या कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि मी दिल्लीला जाणार असून जागा वाटपाचं उद्या फायनल होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT