Ajit Pawar News : '... तर आमचा पदर फाटलाय' ; अजित पवारांचं जाहीर कार्यक्रमात विधान

Pune Crime News : तर त्याला डायरेक्ट टायरमध्ये टाकला जाईल असा इशाराच अजित पवारांनी दिला
ajit pawar
ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील वाढत्या क्राईम रेटवरून गेल्या काही काळापासून सातत्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधताना दिसत आहेत.यामध्ये प्रामुख्याने खासदार सुप्रिया सुळे या पुणे आणि नागपूर हे क्राईम कॅपिटल झाले असल्याची टीका करताना पाहायला मिळत आहेत. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आल्याचे पाहायला मिळाले.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ajit pawar
Supriya Sule News : सुनील शेळकेंचा 'हा' आरोप अन् सुप्रिया सुळे घेणार अमित शाहांकडे धाव

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक कोटी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमातून विकासकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आजच आम्ही पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या असून अधून मधून उपटणाऱ्या कोणत्या गॅंगचा आम्ही सुपडा साफ करणार आहोत. 12ते 14 वर्षाची मुलं कोयते, तलवारी घेऊन दहशत माजवण्याचं काम करतात अशा मुलांना जरब बसवण्याचं काम आम्ही करणार आहोत. या मुलांची वय कमी असल्यामुळे कायद्याला बंधन येत आहेत त्यामुळे अशा मुलांच्या आई-वडिलांना पोलिस स्टेशनला बोलून तुमचा मुलगा काय दिवे लावतोय ते बघा असं सांगणार आहोत. आई-वडिलांनी आपल्या कारट्याला नीटपणे वागायला शिकायला पाहिजे. माझा मुलगा काय करतो हे मला माहितीच नाही असलं बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. मुलांना मुलींना संस्कार लावणं हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे.

नुकतेच पुणे शहरामध्ये मोठे ड्रग रॅकेट उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचे धागेदोरे लंडन पर्यंत पोहोचले आहेत. काही लोक झटपट श्रीमंत होण्यासाठी असे धंदे करतात यामुळे जनतेला समस्यांना सामोरे जावं लागतं. यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.

ajit pawar
Devendra Fadnavis News : अजितदादा अन्‌ सुप्रियाताईंपासून लांब कोपऱ्यात जाऊन फडणवीस फोनवर कोणाशी बोलले?

एखादा मुलगा कितीही बड्याा बापाचा असला तरी त्याची गय केलीा जाणार नाही. पुढे कोणी म्हणलं की माझा मुलगा चुकला एकदा पदरात घ्या, त्यांना मी आधीच सांगू इच्छितो आमचा पदर फाटला आहे. पदरात आणि धोतरात घेण्याची परिस्थिती राहिली नाही. डायरेक्ट टायरमध्ये टाकला जाईल असा इशाराच अजित पवारांनी दिला. विद्येचे माहेरघर असून अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दमच अजित पवारांनी दिला.

(Edited by - MaYur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com