Pune News : देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांना चिमटे काढले. ते म्हणाले, महागाई, गद्दारी या नॅरेटिव्हने निवडणुका जिंकता येत नाहीत. आमच्या विरोधकांच्या भाषणात एक टक्काही विकासांचा मुद्दा नाही. गद्दार आणि खुद्दार यावर निवडणूका जिंकता येत नाही. निवडणूक विकासावर किंवा मोदीजींवर गेली तर आपला पराभव निश्चित आहे, हे विरोधकांना माहित आहे, असा टोला त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत विरोधकांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, पुण्याच्या विकासासाठी पुरंदर विमानतळ खूप महत्वाचं आहे ते आम्ही करणार. महाराष्ट्रात 45 चा नारा आम्ही दिला आहे. आम्ही कोणत्या तीन जागांचा विचार सोडलाय हे आमच्या नेत्यांना विचारून सांगतो. पण आम्ही बारामती जिंकणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal हे स्वतःकरिता एक भूमिका तयार करत आहेत. कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन दिला आहे. असे असताना ते जसा कोणी स्वतंत्र सेनानी बाहेर आलाय, असे वावरत आहेत, अशी टीका त्यांनी केली. माझ्या अटकेकारिता एका पोलिस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती. खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला गेला, पण पोलिसांनी देखील त्यांना साथ दिली नाही, असेही ते म्हणाले.
काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले, काँग्रेस आपल्या कर्माने खाली गेली आहे. त्यांच्या नेत्यांत कॅलिबर नाहीये, हे माहित असताना देखील 17 वेळेला त्यांना लॉचं केलं जात आहे. जी भाषा पाकिस्तान बोलते तीच भाषा आमचे विरोधीपक्षाचे नेते बोलत आहेत.
मोदींचा 'तो' पवारांना सल्ला...
मोदींनी पवारांना दिलेल्या ऑफरबाबत स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, मोदींची पवारांना ऑफर नाही, तर हा सल्ला आहे. बारामतीची जागा अजित पवार यांच्याकडे चालली हे जेव्हा कळलं. तेव्हा ते म्हणाले, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यावेळेस मोदींनी त्यांना सांगितलं तुम्ही अजित पवारांकडे या आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेकडे यावं. म्हणजे तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील, असा सल्ला त्यांनी पवार व ठाकरेंना दिला होता.
लोकसभेची निवडणूक जेवढी तुम्हाला अवघड दिसते, तेवढी ती आम्हाला अवघड वाटत नाही. एक खरं आहे, की ठाकरे पवार नॅरेटिव्ह सेट करत आहेत. तीनही पक्ष म्हणून आमची निवडणूक निट चालली आहे. बीडच्या निकालावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, पंकजाताई या आमच्या नेत्या आहेत. त्या निवडणूक येतील.'
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
उद्धव ठाकरेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांची भेट एखाद्या मनसोपचार तज्ञाशी भेट करून द्या, म्हणजे त्यांचं दडपण कमी होईल, असा टोला लगावून शिवसेनेची हालत फॅमिली फर्स्टमुळे झाली आहे. राष्ट्रवादीची ही हालत फॅमिली फर्स्टमुळे झाली आहे. अजित पवारांकडे आमदार होते, तरी त्यांना डावललं गेलं. प्रत्येक वेळी समोर करून तोंडघाशी पाडल गेलं.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.