Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Arvind Kejriwal Interim Bail : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Supreme Court, Arvind Kejriwal
Supreme Court, Arvind KejriwalSarkarnama

Delhi News : अरविंद केजरीवाल यांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांना कथित दारु घोट्याळ्यात अटक करण्यात आली होती. आज अखेर त्यांना एक जूनपर्यंत जामीन देण्यात आला आहे. (Arvind Kejriwal Bail News)

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अवघ्या 5 मिनिटांत सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने 7 मे रोजी केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

यासोबतच दिल्लीतील दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आज नवीन आरोपपत्र दाखल करण्यात येऊ शकते. ईडीच्या या चार्जशीटमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह संपूर्ण आम आदमी पार्टीलाही आरोपी बनवले जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीनाबाबत वकिलांकडून मागणी करण्यात आली होती. मात्र केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी आणि ईडीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत.

Supreme Court, Arvind Kejriwal
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्या निर्णयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी पुन्हा आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ केजरीवाल पुन्हा 2 जून रोजी तुरूंगात जाणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांची 4 जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत अंतरिम जामीन देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com