MahaBhumi app enables citizens to access land records, property details, land history and valuation from home. sarkarnama
पुणे

MahaBhumi App : तलाठी, तहसीलदारांकडे जाण्याची गरजच नाही, जमिनीची माहिती घरबसल्या; ३६ कोटी कागदपत्रे एका क्लिकवर!

Land Documents Online : राज्य सरकारने तयार केलेल्या अॅपमुळे नागरिकांच्या तलाठी, तहसीलदारांकडे चकरा कमी होणार आहेत. जमीनीचा लेखाजोखा एकाच क्लिकवर मिळणार आहे.

Roshan More

Pune News : जमिनीचा सातबारा हवा असेल, फेरफार अथवा जमीनीचे मुल्याकांन असेल अशा विविध कामांसाठी वारंवार तलाठी, तहसीलदार यांच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. फेरफार हवा असेल तर अर्ज करून विशिष्ट तारखेला बोलावून ती कागदपत्रे दिली जातात. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार यांची विविध कामे खोळंबतात.

सरकारने यावर उपाय काढला असून जमीनी संदर्भातील सर्वच कागदपत्रे एका अॅपवर मिळणार आहेत. सरकारने 'महाभूमी' ॲप विकसित केले असून यावर.

राज्याच्या संपूर्ण जमीनीचा कागदपत्रे, ३६ कोटी कागदपत्रे स्कॅनिंग केलेले आहेत. या बटण दाबली तरी जुना इतिहास, आत्ता काय परिस्थिती आहे, त्यामध्ये मोजणीची काय परिस्थिती आहे, जमिनीचे व्हॅल्यूएकशनची परिस्थिती काय आहे सर्व डेटा उपलब्ध होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जमिनीचे प्रॉपर्टी डिटेल्स, जमिनीचा जुना इतिहास, सद्यस्थिती आणि जमिनीचे व्हॅल्युएशन यांसारखी सर्व महत्त्वाची माहिती घरबसल्या उपलब्ध होणार आहे. यामुळे सातबारा किंवा इतर कागदपत्रांसाठी मोजणी अधिकारी, तलाठी आणि तहसीलदारांच्या कार्यालयात चकरा मारण्याची गरज लागणार नाही.

मुंबई येथे महाभूमी स्टॅक व महा लँड बँक या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे महसूल विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीशी संबंधित माहिती अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महाभूमी स्टॅक प्रणाली काय काय?

३.५ कोटींहून अधिक अधिकार अभिलेख (७/१२ व ८-अ)

१.५ कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका

३६ कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT