Narendra Mehta: भाजप आमदाराच्या शाळेचा अजब फतवा! डब्यात कांदा-लसूण, बटाटा-कंदमुळांनाही बंदी; पालक संतापले

BJP MLA Narendra Mehta School Paryushan Festival Controversy: पालकांमध्ये या निर्णयाबाबत नाराजीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडीवर शाळेकडून अशा पद्धतीने निर्बंध आणणे योग्य आहे का, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे.
BJP MLA Narendra Mehta School Paryushan Festival Controversy
BJP MLA Narendra Mehta School Paryushan Festival ControversyAI
Published on
Updated on

Bhayandar School News: भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेतील एका निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट तसेच कंदमुळांच्या भाज्या आणण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही, तर शाळेच्या कॅन्टीनमध्येही या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे.

यासंदर्भातील नोटीस पालकांना व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे देण्यात आली आहे. जैन समाजाचा आठ दिवसीय पर्युषण पर्व सुरू असल्याने शाळेकडून हे निर्देश देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, विविध समाज आणि धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत अशा प्रकारचे निर्बंध का घालण्यात आले, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडीवर शाळेकडून अशा पद्धतीने निर्बंध आणणे योग्य आहे का, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. मीरा रोड पूर्व येथील ही CBSEशी संलग्न शाळा असून, येथे विविध समाज आणि धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेतात

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही धर्माच्या प्रथा-परंपरा लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. संबंधित शाळेविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याची तयारीही करण्यात आली आहे.

BJP MLA Narendra Mehta School Paryushan Festival Controversy
Manoj Jarange: मनोज जरांगेंसाठी नाशिककर रस्त्यावर! आंदोलक एकवटले; महामार्ग रोखला

मनसे आक्रमक

मनसेसोबतच मराठा एकीकरण समितीनेही या प्रकारावर आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शाळेच्या निर्णयामागील नेमका उद्देश काय, तसेच पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवरच विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांबाबत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नरेंद्र मेहता यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी शाळेच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. कोणत्याही धर्माची श्रद्धा किंवा परंपरा विद्यार्थ्यांवर लादण्याचा यामागे उद्देश नसून, विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहारासाठी प्रोत्साहन देणे हा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

BJP MLA Narendra Mehta School Paryushan Festival Controversy
Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत येणारच, आंदोलन करणारच; ‘भाषा बदलणार नाही’ म्हणत फडणवीस-शिंदेंवर हल्लाबोल

आमदाराची पत्नी संस्थेच्या अध्यक्षा

‘सेवन इलेव्हन एज्युकेशन सोसायटी’कडून ही शाळा चालवली जाते. आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही संस्थेशी संबंधित आहेत. या प्रकरणामुळे आता शाळा प्रशासन, पालक आणि विविध संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली असून, शिक्षण विभाग याबाबत काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com