Mahadev Betting App : Sarkarnama
पुणे

Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरण : मुख्य आरोपींच्या मध्य प्रदेशमध्ये मुसक्या आवळल्या

Sudesh Mitkar

Pune Crime News : देशभरामध्ये गाजलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणांमध्ये काही दिवसापूर्वी पुणे कनेक्शन समोर आले होते. त्यानंतर पुणे पोलि‍सांनी (Pune Police) नारायणगाव (Narayangao) येथील कॉल सेंटरवर छापा टाकत तब्बल 90 जणांना अटक केलं होत. मात्र यामागचे मुख्य सूत्रधार फरार असल्याचे समोर आलं होतं. आता पोलिसांनी या मुख्य तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

महादेव बुक आणि लोटस 365 ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन सट्टा प्रकरणातील फरार असलेल्या तीन मुख्य आरोपींना शहानगर (मध्य प्रदेश) येथून अटक करण्यात आली आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शीळीमकर (Avinash Shilimkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महादेव बेटिंग अँप प्रकरणी पोलिसांनी (Police) आतापर्यंत 96 जणांना अटक केली असून फरार असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. राज बोकारिया, ऋत्विक कोठारी, मोहमद पठाण असे अटक करण्यात आलेल्या तीन मुख्य सुत्रधारांची नावे आहे. नारायणगाव शहरामध्ये तीन मजली इमारतीत फेब्रुवारी 2024 पासून महादेव बुक आणि लोटस 365 ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा लावण्याची काम सुरू होते.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस उपविभागीय अधिकारी खेड यांच्या पथकाने 15 मे रोजी पहाटेच्या सुमारास छापा या ठिकाणी छापा टाकला होता. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांसह 99 आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यापैकी 96 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र तीन मुख्य आरोपी फरार होते. त्यांच्या मुसक्या आवळण्यात आता पोलिसांना यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT