Ravindra Dhangekar, Hemant Rasane, Ganesh Bhokare, Kamal Vayavaye, Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Kasba Assembly Election 2024 : 'मराठा उमेदवार ओळखा!' जरांगे पाटलांचे कसब्यात लावलेले 'ते' बॅनर कोणाच्या समर्थनासाठी?

Maratha candidates banner by Jarange Patil in Kasba: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरला असताना पुण्यातील बहुचर्चित कसबा विधानसभा मतदारसंघात मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

सागर आव्हाड

Pune News, 19 Nove : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरला असताना पुण्यातील बहुचर्चित कसबा विधानसभा मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

'कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, एक मराठा लाख मराठा' या मजकूरासह या बॅनरवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा फोटो देखील या बॅनरवर छापण्यात आला असून ते बॅनर अनेक चौकांमध्ये लावले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, कसबा विधानसभा मतदारसंघात प्रमुख लढत असलेले काँग्रेस, भाजप आणि मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार हे ओबीसी आहेत.

तर या मतदारसंघात अपक्ष लढणाऱ्या कमल व्यवहारे या एकमेव मराठा समाजातील उमेदवार आहेत. त्यामुळे व्यवहारे यांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे, मतदानाला अवघे काही तास उरले असताना लागलेल्या या बॅनर्समुळे राजकीय वातावरण तापातल्याचं पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्या सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सर्वच उमेदवारांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता कसबा मतदारसंघातील 'एक मराठा लाख मराठा' या घोषणा असलेल्या बॅनर्समुळे चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवार उभे करणार नसल्याचे सांगितलं होते. मात्र, कोणत्या मतदारसंघात कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं हे समाजाने ठरवावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला होता. त्यामुळे कसब्यात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लागलेल्या या बॅनरमुळे कोणाचा फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे पुन्हा एकदा काँग्रेसकडून मैदानात आहेत. तर भाजपककडून हेमंत रासने, मनसेचे गणेश भोकरे आणि काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून कमल व्यवहारे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. या चौघांमध्ये ही प्रमुख लढत होणार आहे.

तर काँग्रेस भाजप आणि मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार ओबीसी समाजातून येतात. तर कमल व्यवहारे या मराठा उमेदवार आहेत. त्यामुळे काल या मतदारसंघात मनोज जरांगे पाटलांचे लागलेले बॅनर्स हे त्यांच्या समर्थनार्थच लावल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT