Madhuri Misal  sarkarnama
पुणे

Madhuri Misal : 'पर्वती मतदारसंघातून मीच लढणार', उमेदवारीवर माधुरी मिसाळ ठाम

Madhuri Misal Parvati constituency assembly election : माधुरी मिसाळ म्हणाल्या, उमेदवारी मागावी यात काहीही चूक नाही. पण एकदा पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होते.

सरकारनामा ब्यरो

Madhuri Misal News : पुणे शहरातील पर्वती मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस पाहण्यास मिळत आहे. इच्छुक उमेदवार पोस्टरबाजी करत उमेदवारीवर दावा सांगत आहेत. मात्र, 'मी पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढणार असून, त्यासंदर्भातने सुरु असलेल्या चर्चेला काही अर्थ नाही', असे मिसाळ यांनी ठणकावून सांगितले.

मी पर्वती मधूनच लढणार आहे. हा मतदारसंघ सोडून मी कुठे जाऊ? असा प्रश्‍न देखील मिसाळ यांनी उपस्थित केला.

माधुरी मिसाळ यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देताना पर्वती मतदारसंघात उमेदवारीवरून सुरू असलेल्या चुरशीवरून मिसाळ म्हणाल्या, उमेदवारी मागावी यात काहीही चूक नाही. पण एकदा पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होते.

ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार. तसेच पर्वती मतदारसंघामध्ये जातीवर मतदान होत नाही, तेथे काम बघुनच मतदान होते,असे देखील मिसाळ म्हणाल्या.

मंत्रि‍पदावर नशीबात असेल तर...

माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केले आहे. मात्र, त्यांना मंत्रि‍पदाची संधी मिळालेली नाही. यावर त्यांना पत्रकारांनी विचारले असला मिसाळ म्हणाल्या, कामाचा आणि मंत्रिपदाचा काही संबंध नाही.पक्षाला जेव्हा योग्य वेळ वाटते तेव्हा मंत्री केले जाते. वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पुढे काही मिळत नाही.

(Edited by Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT