Raj Thackeray Vs Eknath Shinde : नक्की कुणामुळे टोलमाफी? मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मी आंदोलन केलं, कोर्टात गेलो...

Toll Free Mumbai Cabinet Decisions MNS Shiv Sena : मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Raj Thackeray, Eknath Shinde
Raj Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतली की त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू असते. मुंबईतील टोलमाफीच्या निर्णयाबाबतही तसेच घडत आहे. निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.

मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमुक्तीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. टोलमाफीची अनेक वर्षांची मागणी होती. त्यावर सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

Raj Thackeray, Eknath Shinde
Raj Thackeray : टोलमुक्तीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंचा कॉन्फिडन्स वाढला! कार्यकर्त्यांना म्हणाले...

निवडणुकीच्या तोंडावर हा लोकप्रिय निर्णय घेण्यात आल्याने आता त्याच श्रेय घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना हे पक्ष सरसावले आहेत. निर्णय जाहीर होतात राज ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करत सरकारसोबतच मनसे कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले.

रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली. आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब असल्याचे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Raj Thackeray, Eknath Shinde
Cabinet Decisions : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा धमाका; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही अनेक वर्षांची मागणी होती, ती सरकारने पूर्ण केल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी मी आमदार असताना आंदोलन केले आणि कोर्टातही केल्याची आठवण शिंदेंनी करून दिली. एकीकडे नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असताना कार्यकर्तेही मागे नव्हते.

टोलमाफीचा निर्णय होताच मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते काही टोलनाक्यांवर जमा झाले. तिथेच फटाके फोडण्यात आले. पेढे वाढले. घोषणाबाजी करण्यात आली. आपला पक्ष आणि नेत्यांना श्रेय देण्याची चढाओढ या कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. त्यामुळे टोलमाफीच्या निर्णयावरून आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com