Sharad Pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar: आता कुठे तरी थांबायला पाहिजे ! शरद पवार यांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत VIDEO पाहा

Sharad Pawar Political Retirement From Parliamentary Politics:"नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे”, असे सांगत युग्रेंद्र पवार यांनी निवडून देण्याचे आवाहन शरद पवारांनी उपस्थितांना केले.

Mangesh Mahale

Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे. बारामती विधासभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यात त्यांनी केलेल्या विधानामुळे ते सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे दिसते.

मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल, लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, याचा अर्थ समाजकारण सोडणार नाही. सत्ता नको, मात्र लोकांची सेवा लोकांचं काम करत राहीन, असे शरद पवार यांनी सांगितले.

"नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे”, असे सांगत युग्रेंद्र पवार यांनी निवडून देण्याचे आवाहन शरद पवारांनी उपस्थितांना केले. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या, असे शरद पवार म्हणाले.

कालची (लोकसभा) निवडणूक ताईंची (सुप्रिया सुळे) झाली. ताईंची निवडणूक काय साधी होती का? निवडणूक घरातीलच होती. पण तरीही बारामतीकर भारी आहेत. या तालुक्याने ताईंना ४८ हजार मते अधिक दिले. हे काम तुम्ही केलं. आताही तुम्ही मागे पाहणार नाही. त्यामुळे मला चिंता नाही. उद्याच्या निवडणुकीत हाच दृष्टीकोन ठेवा”, असे शरद पवार यांनी सांगितले.

माणसं मला ओळखतात. मी त्यांना ओळखतो. कुणाचं काय करायचं, कसली भावना? कसलं काय. काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही भारी आहात," असे पवार म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

  • तुम्ही दिलेल्या पाठिंब्यावर मी विधानसभेत गेलो. राज्यमंत्री झालो. मंत्री झालो. चार वेळा मुख्यमंत्री झालो. केंद्रात संरक्षण, शेती खात्यात काम केलं.

  • एक गोष्ट लक्षात ठेवा की मी लोकसभेत तुमच्या मतांवर निवडून गेलो. पहिल्यांदा ठरवलं की, आता लोकसभा लढवायची नाही.

  • ३०-३५ वर्षे सतत निवडून गेल्यानंतर नवीन पिढी तयार केली पाहिजे. काही वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की, मी लोकसभेवर जाणार नाही. राजकारण मी पाहणार नाही.

  • ही जबाबदारी मी अजित पवार यांच्यावर सोपवली. तेव्हापासून २०-२५ वर्षे ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

  • पहिली ३० वर्षे माझ्यावर. माझ्यानंतर ३० वर्षे अजित पवार आणि आता पुढच्या ३० वर्षांची तयारी करण्याची आवश्यकता आहे.

  • ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची दृष्टी पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT