Maharashtra Excise inspector Jitendra Patil was arrested in an alleged liquor license bribe case involving a ₹22 lakh demand. Sarkarnama
पुणे

Excise Bribe Case : मद्य परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी 22 लाखांची लाच; उत्पादन शुल्क निरीक्षकाला अटक

Excise inspector 22 lakh bribe case : मद्य परवान्याची फाईल मंजुरीसाठी पुढे पाठविण्यासाठी आरोपी निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. मद्य परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी १२ लाख, कंपनीच्या मायक्रोब्रुअरीची फाईल मंजूर करण्यासाठी ८ लाख, अशी एकूण २० लाखांची मागणी करण्यात आली होती.

Jagdish Patil

Pune News, 11 Aug : मद्य परवान्याची फाईल मंजूर करून देण्यासाठी तब्बल २२ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जितेंद्र पाटील असे अटक करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका ४७ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार हे लायसन्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांनी एका कंपनीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एफएल-३ अर्थात मद्य परवान्यासाठी अर्ज केला होता.

या अर्जाची फाईल मंजुरीसाठी पुढे पाठविण्यासाठी आरोपी निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. मद्य परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी १२ लाख रुपये, तर त्याच कंपनीच्या मायक्रोब्रुअरीची फाईल मंजूर करण्यासाठी ८ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची पडताळणी सुरू केली. १३ एप्रिल तसेच २१ आणि २२ मे रोजी तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे २२ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.

त्यानंतर लाचेच्या रकमेबाबत तडजोड झाली. तडजोडीअंती ११ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जितेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT