Ajit Pawar In State : राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये येताच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर त्यांना शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी खातेवाटप करण्यात आले. यावेळी सर्वाधिक महत्वाचे अर्थ तथा वित्त खाते हे अपेक्षेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले. हे खाते मिळणार असा ठाम विश्वास असलेल्या अजितदादांनी या खात्याची आढावा बैठक शुक्रवारी सकाळीच मंत्रालयात घेऊन कामही सुरु केले. (Latest Political News)
यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारातही अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. ते आपल्या समर्थकांसह भाजप, शिवसेनेच्या सरकारात २ जुलै रोजी सामील झाले. त्यांच्यासह त्यांच्या गटाच्या नऊ आमदारांचा मंत्री म्हणून त्याच दिवशी शपथविधी झाला. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या वीस जणांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल होणार होता. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आतापर्यंत खातेच मिळाले नव्हते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. यानंतर आज खातेवाटप करण्यात आले. अपेक्षेनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाला वजनदार खाती मिळालेली आहेत. सर्वात वजनदार अर्थ हे खाते अजित पवारांनी मिळवले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांनाही वजनदार खाती मिळवून देण्यात यश आल्याचेही दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवारांचा अर्थ खात्यासाठीच आग्रह होता. तर, त्याला शिवसेना मंत्र्यांचा विरोध होता. मात्र, तेच खाते अजितदादांना राजभवनात सायंकाळी जाहीर करण्यात आले. आपल्याला अर्थखाते मिळणार याची त्यांना ठाम खात्री होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज सकाळीच या दोन्ही खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या खात्यांचा नव्याने आढावा घेतला. दोन्ही खात्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर आणि ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर ते नागरिकांनाही भेटले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.