Maharashtra Khate Vatap : मंत्रिपदांवरून एकनाथ शिंदेंचं भलं तर अजित पवारांचं चांगभलं; मिळवली वजनदार खाती

Ajit Pawar And Eknath Shinde in State Government : शिवसेनेच्या आमदारांची नाराजी दूर करून मंत्रिपदेही वाचली
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महाराष्ट्रात एकाच वर्षात दोन राजकीय भूकंप झाले. शिवसेना फुटली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटून राज्य सरकारमध्ये सहभागी झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना योग्य अशी खाती मिळवून देण्यात यश मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही आपल्या आमदारांची नाराजी दूर केल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

शिंदे गटातील मंत्र्यांच्या कार्यशैलीवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती होती. त्यामुळे संबंधितांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आली होती. यामुळे शिंदे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यात तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि तत्कालीन अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड या पाच मंत्र्यांचा समावेश होता.

Ajit Pawar, Eknath Shinde
Maharashtra Khate Vatap: खाते वाटप तर झालं; पण भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीकडे किती अन् कोणती खाती? मंत्रिमंडळात कुणाचा वरचष्मा

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. यावेळी शिंदे गटातील सर्व मंत्र्याची मंत्रिपदे शाबूत राहिल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अब्दुल सत्तार यांचे कृषी आणि संजय राठोड यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. सत्तार यांना अल्पसंख्याक तर राठोड यांना मृदा व जलसंधारण मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनीही महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारी खाती पदरात पाडून घेतली आहेत.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ व नियोजन, गृह खाते, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, राज्य उत्पादन शुल्क, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, अल्पसंख्यांक आणि कामगार ही खाती होती. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ व नियोजन, सहकार, कृषी, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध व प्रशासन, क्रीडा, महिला व बालकल्याण, वैद्यकीय शिक्षण ही खाती मिळवली आहेत.

Ajit Pawar, Eknath Shinde
Abdul Sattar News : अब्दुल सत्तारांना 'जोर का झटका धीरे से!' ; कृषी मंत्रालय काढून दिलं 'हे' खातं

दरम्यान, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास नकार देणाऱ्या आमदारांची समजूत घालण्यात आणि आपल्या मंत्र्याची मंत्रिपदे वाचवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. तर अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना तगडी खाती मिळवून देण्याची मोठी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com