Shinde Fadnavis Pawar Government Portfolio : शिंदे - फडणवीस - पवारांच्या मंत्रिमंडळात सारेच कॅबिनेट ; आता राज्यमंत्र्यांची प्रतीक्षा !

Maharashtra Government : ...आणि अखेर मॅरेथॅान बैठकांच्या सिलसिल्यानंतर खातेवाटपाचा तिढा सोडविण्यात यश आलं.
Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचा एक मोठा गट राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला होता. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, यानंतर खातेवाटपावरुन तीनही पक्षांमध्ये खातेवाटपाचा पेच अखेर सुटला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्यपाल रमेश बैस यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता शिंदे - फडणवीस - पवार यांच्या युती सरकारमध्ये एकूण २६ कॅबिनेट मंत्री असणार आहेत. विशेष म्हणजे एकही राज्यमंत्री या मंत्रिमंडळात नाही. त्यानंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.१४) खातेवाटप जाहीर केले आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार; २२ जुलैला ठाण्यात 'उत्तर भारतीय मेळावा'

राज्यात गेल्या काही दिवसांपासून खातेवाटपाबाबत पडद्यामागं अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अनेक बैठका होऊन देखील खातेवाटपावर तोडगा काढण्यात अपयश येत होते. त्यानंतर अजित पवार(Ajit Pawar) त्यासाठी दिल्लीलाही गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी(दि.१३) रात्री तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. आणि अखेर मॅरेथॅान बैठकांच्या सिलसिल्यानंतर खातेवाटपाचा तिढा सोडविण्यात यश आलं.

राज्य सरकारच्या जाहीर करण्यात आलेल्या खातेवाटपात फेरबदल करण्यात आले आहेत. याचवेळी भाजप आणि शिवसेना यांच्याकडील काही खाती काढण्यात आली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असलेलं अर्थ खातं अजित पवारांकडे देण्यात आलं आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली असून धनंजय मुंडे यांना दिली आहे. तर अतुल सावे यांच्याकडे असलेलं सहकार खातं दिलीप वळसे पाटलांना देण्यात आलं आहे. मात्र, सध्या शिंदे फडणवीस पवार सरकारमध्ये मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह २६ जणांचं मंत्रिमंडळ असलं तरी त्यात एकही राज्यमंत्री नाही.

Eknath Shinde Devendra Fadnavis 
 Ajit Pawar Government
Maharashtra Khate Vatap : मंत्रिपदांवरून एकनाथ शिंदेंचं भलं तर अजित पवारांचं चांगभलं; मिळवली वजनदार खाती

आता युती सरकारच्या रखडेलला मंत्रिमंडळ विस्तार देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. यात मंत्रिपदासाठी भाजपसह शिवसेनेमधील इच्छुकांची संख्या मोठी आहे. आता त्यात मंत्रिपदासाठी अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी शिंदे फडणवीसांकडून नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यात राज्यमंत्री फडणवीस

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com