Pune News : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाला आहे. असं असलं तरी आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की सर्व पक्षाकडून स्वबळाचा नारा दिला जाणार याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देखील अनेक ठिकाणी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट युती न करता ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचा त्यांनी एक फॉर्म्युला देखील सांगितला आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जलद गतीने सोडवण्यात यावी, यासाठी कोर्टाने खंडपीठ स्थापन करण्याच्या आदेश दिले आहेत.त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, खंडपीठ स्थापित करण्याबाबत आमची पूर्ण तयारी आहे. हायकोर्टा कडून खंडपीठ स्थापित केल्यानंतर आम्ही सरकारची बाजू भक्कमपणे मांडू.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार राहणार का ? याबाबत फडणवीस म्हणाले, आम्हाला या निवडणुका महायुती म्हणून लढाईची आहे. आम्ही तिघेही एकत्र आहोत.आमच्या तिघांची ही महायुती आहे. मात्र काही अपवादात्मक ठिकाणे वगळता इतर सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत.
स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ असे उमेदवार असतील त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढू शकतो. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार करून आम्ही निवडणुका लढवू. मात्र जास्तीत जास्त ठिकाणी आणि महायुती करूनच निवडणुका लढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचा फडणवीस म्हणाले.
पुण्यामध्ये देखील स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी भावना आहे. त्याबाबत फडणवीस म्हणाले, कार्यकर्त्यांची भावना असणे स्वाभाविक आहे. कारण कार्यकर्ते जे पाच, सात वर्षे काम करत आहेत त्यांना वाटत आहे की आता आपली संधी आहे. आपल्याला संधी मिळाली पाहिजे अशी भावना आहे. ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती होईल. ज्या ठिकाणी युती होणे कठीण आहे. त्या ठिकाणी निवडणुकांच्या निकालानंतर एकत्र येऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.