Pune News: बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election 2024) महायुती अंतर्गत असणारे वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढाकार घेतला आहे. हर्षवर्धन पाटलांची (Harshvardhan Patil) नाराजी दूर करण्यासाठी इंदापूरमध्ये नुकतीच सभा घेण्यात आली. यानंतर आता राज्यातील प्रमुख तीन नेते सासवड येथे जाहीर सभा घेणार आहेत.
या माध्यमातून शिवसेना नेते विजय शिवतारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सभांच्या माध्यमातून अजित पवार आणि विजय शिवतारे व हर्षवर्धन पाटील यांच्यात पॅचअप करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुका राजकीय पक्ष महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून एकत्रितरित्या सामोरे जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र आहेत. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे एकत्रित आहेत.
प्रत्येक मतदारसंघात यापैकी कोणत्यातरी एका पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्या उमेदवाराला इतर पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी समन्वय साधन सध्या अवघड जात आहे. इतर पक्षातील नेते उमेदवाराकडे विविध मागण्या करत असून बहुतांश जण विधानसभेचा शब्द घेऊनच लोकसभेला काम करण्याची भाषा करीत आहेत. यामुळे अशा नेत्यांना समजावण्यात वरिष्ठ नेत्यांची आणि उमेदवारांची डोकेदुखी वाढत आहे.
पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार देण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या उमेदवाराचं काम भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना करायचा आहे.
यावेळी या दोन्ही पक्षातील नेत्यांना विधानसभेचा शब्द अजित पवारांकडून मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. इंदापूरमधून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वीच आपलं मत व्यक्त केले असून विधानसभेचा शब्द मिळाल्यानंतरच आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करू असं सांगितलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांना देखील अजित पवार कडून शब्द हवा आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून अजित पवार आणि या नेत्यांमध्ये पॅचअप घडवन आणत आहेत. त्याचा पहिला अंक इंदापूर मध्ये पाहायला मिळाला त्यानंतर आता बारामती लोकसभेसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार 11 तारखेला सासवड येथील पालखीतळ मैदान येथे सभा येणार आहेत.
या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे हे अजित पवारांसोबत हे एकत्र असल्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. विजय शिवतारे यांच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काही मागण्या मान्य केलं असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. या मागण्या हे तिन्ही नेते एकत्रितपणे सासवड येथील मंचावरून सांगणार असल्याचं विजय शिवतारे त्यांनी सांगितले आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज विजय शिवतारे सासवड येथे बैठक घेणार आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.