Supriya Sule News: बारामतीत हाय होल्टेज ड्रामा? सुळेंचे प्रचारप्रमुख प्रवीण माने अजित पवार गटात...

Baramati Lok Sabha 2024: प्रवीण माने जर अजित पवार गटात सहभागी झाले तर सुप्रिया सुळे यांना तो मोठा धक्का असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. माने याबाबत आज आपली भूमिका मांडणार आहेत.
Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Supriya Sule Vs Sunetra Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha Election 2024) आज हाय होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे प्रचार प्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने (Praveen Mane) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) जाणार असल्याचे बोलले जाते. प्रविण माने याबाबत आज आपली भूमिका मांडणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली होती. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यातील प्रचार प्रमुख आहेत.

शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) सर्व निवडणुका माने यांच्या नेतृत्वाखाली होणार अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते. माने जर अजित पवार गटात सहभागी झाले तर सुप्रिया सुळे यांना तो मोठा धक्का असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपूर्वी त् सुळे यांच्या प्रचारार्थ कोपरा बैठकांचे आयोजन केले होते, मात्र अचानक शरद पवारांच्या सभेला प्रवीण माने व त्यांचे वडील दशरथ माने उपस्थित नव्हते,तेव्हापासून इंदापूर तालुक्यात अजित पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु आहेत. \

माने आज काय भूमिका घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहेत. माने पित्रा-पुत्र बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देतील ही शक्यता नाकारत येत नाही. प्रवीण माने यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत.

Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Vaishali Darekar News: भाजपची कीव येते, फडणवीसांनी एकदाचं केलं जाहीर; वैशाली दरेकरांचा टोमणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com