Pune News: एकीकडे राज्य सरकारकडून लाडकी बहीण यासारख्या सामाजिक योजनांसाठी निधी टंचाईचं कारण देत अडथळे आणले जात असताना, दुसरीकडे मंत्र्यांची परदेशवारी मात्र जोमात सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. २०२५ मध्ये मंत्र्यांनी केलेल्या किंवा नियोजित परदेशभ्रमंतीची यादी समोर ठेवत सरकारवर सडकून टीका केली आहे.
कुंभार म्हणाले, “जनतेच्या पैशातून युरोपच्या सहली, फाईव्ह स्टार हॉटेल्स, आलिशान फ्लाईट्स आणि साईटसीइंग सुरू आहे. लोककल्याणासाठी पैसा नाही, पण मंत्र्यांच्या मौजमजेसाठी मात्र कोणतीही अडचण नाही. ही लोकशाहीची थट्टा आहे"
या दौर्यांमध्ये लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. तो सर्व जनतेच्या कररूपी पैशातून केला गेला जात आहे. मंत्री हॉटेल, आलिशान फ्लाइट्स, साईटसीइंग सगळं VIP दर्जात अनुभवत आहेत,असा आरोप कुंभार यांनी केला.
सरकारकडून या परदेशवाऱ्या 'शासकीय दौरे' असल्याचं सांगण्यात येतं, मात्र या सहलींचे खरे उद्देश, लाभ आणि जनतेपर्यंत त्याचे पडसाद पोहोचत आहेत का, असा प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून "लाडकी बहिण" सारख्या योजनांना निधी न मिळाल्याने हजारो महिलांना वेळेवर लाभ मिळत नाही. एकीकडे सरकारकडून सांगण्यात येते की, "लाडकी बहिण" योजनेसाठी पुरेसा निधी नाही, त्यामुळे इतर खात्यांतून पैसे वळवावे लागत आहेत. मात्र, मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी मात्र कोट्यवधी रुपये सहज मंजूर होतात.जयकुमार रावल यांचा नुकताच झालेला फ्रान्स, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड दौरा चर्चेचा विषय ठरत असतानाच, आणखी काही मंत्र्यांची 'व्हीआयपी टूर' यादी उघड झाली आहे
जयकुमार रावल – युरोप
इंद्रनील नाईक – जर्मनी
आशिष शेलार – स्पेन
नितेश राणे – नेदरलँड
उदय सामंत – यूएई
देवेंद्र फडणवीस व उदय सामंत – दावोस, स्वित्झर्लंड
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.