Sunil Prabhu: आमदार सुनील प्रभू बोलताना चुकले की पोटातलं आलं ओठावर...

Shiv Sena-MNS Alliance: दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी आमची इच्छा आहे. तशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असे प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी नागरिकांना वाटते. ती इच्छा भविष्यात पूर्ण होईल, असे आम्हालाही वाटते.
Sunil Prabhu
Sunil PrabhuSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील आरोप प्रत्यारोप केले आहेत.

महाराष्ट्रातील हे दोन बंधू एकत्र यावे, यासाठी देखील अनेकांनी प्रार्थना केली. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन बंधू एकत्र येणार का? येणार असतील तर ते कधी येणार याची उत्सुकता अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना लागली आहे. त्यावर ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रभू यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर होते.

दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी आमची इच्छा आहे. तशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असे प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी नागरिकांना वाटते. ती इच्छा भविष्यात पूर्ण होईल, असे आम्हालाही वाटते. दोन्ही भावांमध्ये कोणीही येऊ शकत नाही, ते दोन भाऊ मिळूनच हे ठरवणार आहेत. अशा शब्दात ठाकरे बंधूंच्या मिलनावर आमदार सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज झाली. शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू, उपनेते संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, उपनेत्या जान्हवी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली.

Sunil Prabhu
Sarkarnama Headlines: तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी! वाचा दुपारपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

आमदार प्रभू म्हणाले, "प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. आणि त्यानुसार प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करत असतो. कार्यकर्त्यांच्या भावना कोल्हापुरातल्या आजच्या बैठकीत जाणून घेतल्या. शिवसेनाप्रमुखांचा करिष्मा मोठा, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची त्यांच्यात शक्ती आहे. महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणा करते, मात्र लोकांमध्ये अस्वस्थता आहे. समाजातल्या कोणावर अन्याय होत असेल तर सुरुवातीला सगळ्यात पहिला रस्त्यावर कोण येत असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याचे आमदार प्रभू म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com