Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar: सदाभाऊंच्या तोंडून जो गाळ बाहेर पडला त्याला काळ योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही!

Vidhan Sabha Nivadnuk 2024 Rohit Pawar Attack ON Sadabhau Khot: "सदाभाऊ ही राज्याच्या राजकारणातील विकृती आहे. अशा राजकीय विकृतीला राज्यात पोसण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

Mangesh Mahale

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भाजपचे नेते, सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावरुन महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना फटकारले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करीत रोहित पवार यांनी सदाभाऊंवर जहरी टीका केली आहे. "सदाभाऊ ही राज्याच्या राजकारणातील विकृती आहे आणि अशा भाड्यावर ठेवलेल्या अनेक राजकीय विकृतीला राज्यात पोसण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं," असे रोहित पवार यांनी एक्सवर म्हटलं आहे.

सदाभाऊच्या तोंडून जो गाळ बाहेर पडला त्याला काळ योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय साहेबांबाबत केलेल्या त्यांच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो आणि महाराष्ट्रानेच अशी विकृती राजकारणातून हद्दपार करावी, असं आवाहन करतो. त्यासाठी लोकांनी विचार करावा अशी विकृती २०१४ पासूनच या महाराष्ट्रामध्ये का वाढतेय आणि त्यामागे कोण आहे, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवारांची राष्‍ट्रवादी आणि अजित पवार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सदाभाऊ खोतांकडून दिलगिरी व्यक्‍त केली आहे 'भाषणात शरद पवार यांच्यावर बोलताना मी जी भाषा वापरली ती गावगड्याची भाषा आहे. या भाषेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,' असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

जतमधील सभेत देवेंद्र फडणवीसांसमोर सदाभाऊ खोतांनी हे वादग्रस्‍त वक्‍तव्य केलं होतं. यावेळी पडळकरही उपस्‍थित होते. शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची पुण्यातील आज पत्रकार परिषद होणार होती. पण ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT