Sharad Pawar News : ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर दाखल झाले होते. छगन भुजबळ यांच्या भेटीवर शरद पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
'मला ताप होता. मात्र, भुजबळांनी भेटायचा आग्रह धरला. महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी आहेत असे ते म्हणाले. जरांगेंशी मुख्यमंत्री शिंदेसोबत काय चर्चा केली हे आम्हाला माहीत नाही. सरकारने जरांगेंना काय आश्वासन दिले, ओबीसी आंदोलकांना काय आश्वासन दिले याचे वास्तव समोर येत नाही तो पर्यंत बैठकीला जायचे नाही, अशी आमची भूमिका होती. शिंदेंनी मनोज जरांगे आणि हाके यांच्याशी चर्चा काय केली हे मला माहीत नाही. सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी.', असे शरद पवार म्हणाले.
पवार म्हणाले, हल्ली त्यांची (भुजबळ) दोन चार भाषण चागंली झाली. त्यांनी दोन्ही भाषणामध्ये माझ्या विषयी आस्था व्यक्ती केली. ठीक आहे. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या तर त्यात महाराष्ट्राचे हित आहे. तुम्ही यात असल्याचे पाहिले. मात्र, सरकारने जरांगेंशी काय चर्चा केली. सरकारने त्यांना ओबीसी आंदोलनकर्त्यांना काय कमिंटमेंट केल्या आहेत त्याचे वास्तव समोर येत नाही तोपर्यंत चर्चा करण्यात काही अर्थ नाही.
छगन भुजबळ यांनी बारामतीमधील 'जनसन्मान' यात्रेत शरद पवार यांच्यावर थेट टीका केली होती. बारामतीमधून फोन आल्याने विरोधी पक्षातील नेते हे आरक्षणाच्या संदर्भातील बैठकीला उपस्थित राहिले नाही, असे म्हणत शरद पवारांच्या भोवती संशय निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ यांनी केला. सुप्रिया सुळे यांनी भुजबळांना प्रत्युत्तर देखील दिले. मात्र, शरद पवारांवर आरोप करून 24 तासही होत नाही तोच भुजबळ हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी 'सिल्वर ओक'वर दाखल झाले होते.
भुजबळ अचनाक 'सिल्वर ओक'वर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. अचानक पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या भुजबळांना तब्बल दीड तास ताटकळत थांबावे लागले. पवारांच्या भेटीनंतर भुजबळ यांनीच खुलासा केली की राजकीय भेट नव्हती. महाराष्ट्रात मराठी-ओबीसी वादाने सामाजिक वीण उसवत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी आपण शरद पवारांना भेटलो.
बारामतीमध्ये शरद पवारांवर टीका केल्यानंतर मात्र पुढील 24 तासांमध्येच छगन भुजबळ यांनी यूटर्न घेतला. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सगळ्यांमध्ये ते वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राची सामाजिक जाण त्यांना सर्वाधिक आहे, असे म्हणत भुजबळांनी शरद पवारांची स्तुती केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.