State Commission for Women Sarkarnama
पुणे

State Commission for Women : मोठी बातमी : राजकीय पक्षाच्या अध्यक्षालाच हवे महिला आयोगाचे अध्यक्षपद; वेळप्रसंगी 'राष्ट्रवादी'त प्रवेश करण्याची तयारी

Jyoti Mete news : एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक वर्षे मी काम केलेले आहे. हे काम करत असताना मोठ्या जबाबदाऱ्या मी पार पडल्या आहेत, असे ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे चाकणकरानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्णपणे लक्ष हे या निवडणुकीवर आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः बारामतीच्या मैदानात उतरल्या असल्याने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय या निवडणुकीच्या निकालानंतरच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

असं असलं तरी अनेक महिला नेत्या या पदासाठी फिल्डिंग लावून असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच त्यांनी आज सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी देखील उपस्थिती लावली. सुनेत्रा पवार या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अजितदादांप्रमाणेच विकास कामे करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकीकडे राष्ट्रवादी सोबत वाढणारी ज्योती मेटे यांची जवळीक आणि दुसरीकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळावं, याची व्यक्त केलेली इच्छा आणि वेळेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची देखील दाखवलेल्या तयारीमुळे ज्योती मेटे यांच्या गळ्यात महिला आयोगाचे पद पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

दरम्यान, याबाबत ज्योती मेटे यांना विचारले असता त्या म्हणल्या, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची माझी क्षमता आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक वर्षे मी काम केलेले आहे. हे काम करत असताना मोठ्या जबाबदाऱ्या मी पार पडल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे ते पद सांभाळण्याची क्षमता आहे. जर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची मला संधी मिळाली आणि त्या अनुषंगाने जर पक्षप्रवेशाच्या भूमिका मला घ्याव्या लागल्या तर, ती घेईल असे स्पष्ट संकेत ज्योती मेटे यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT